शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित सार्वजनिक विहिरी झाल्या हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:59 IST

शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो.

ठळक मुद्देपाण्याची पातळी वाढली : पाणी टंचाईच्यावेळी पाण्याचा वापर

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो. ही बाब मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती देऊन पाणी टंचाईच्या वेळी त्याचा वापर होऊ शकतो, याची कल्पना विस्तृतपणे सांगितल्यानंतर सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती करण्यात हिरवी झेंडी देण्यात आली. आणि काय आश्चर्य विहिरीतील उपसा करुन डागडजी केल्याने सदर दुर्लक्षित विहिरी हायटेक झाल्याचे दिसून येत आहे.नेहमी दुर्लक्षित असलेल्या विहिरी आज पाण्याने व्याप्त असून टंचाईच्या वेळी त्याचा वापर होणार असल्याने पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत झाली आहे.नगर परिषद मूल अंतर्गत येणाºया विविध वॉर्डात ४० सार्वजनिक विहिरी आहेत. सदर विहिरी दुर्लक्षित असल्याने त्यातील पाण्याचा वापर तर सोडाच त्या विहिरीकडे ढुंकूनसुद्धा कुणी बघत नव्हते. घाणीच्या साम्राज्यात असलेल्या विहिरी दुर्लक्षितपणामुळे ओस पडल्या होत्या. या ठिकाणी एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची भीतीही तेवढीच होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सार्वजनिक विहिरीबाबत काय करता येईल, याबाबत इंटरनेटचा वापर करुन माहिती शोधली. विहिरीना मूर्त रुप देता येऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या लक्षात आणून दिली. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कक्षात राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक विहिरीबाबतची माहिती देण्यात आली. त्याला ना. मुनगंटीवार यांनी संमती देताच मुख्याधिकारी सरनाईक यांनी पाणी पुरवठा विभागाचे विनोद येनूरकर यांना कल्पना व सविस्तर माहिती देऊन कामाला सुरुवात करण्यात आली. प्रथमत: प्रायोगिक तत्वावर १० सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्यात आला. डागडुजी करुन विहिरीला अप्रतिम रंगविण्यात आले. त्यामुळे आजच्या स्थितीत विहिरी स्वच्छ व सुंदर दिसत आहेत. विहीरीतील पाण्याची पातळी तर वाढली त्याच बरोबरच दुर्लक्षित असलेल्या विहिरी सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे दिसून येते. वरील विहिरीतील पाण्याचे नमुने वेध शाळेत नेऊन तपासणी केली जाणार आहे. पाणी वापरण्याजोगे करण्यासाठी काय करता येईल. याबाबत पाण्याच्या नमून्यातील निकाल आल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास पाण्याची पातळी वाढली असल्याने व विहिरी सुशोभिते दिसत असल्याने सर्वाचे लक्ष वेधत असून सार्वजनिक कामासाठी पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. या विहिरींचा कायापालट करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केलेला प्रयोग सर्वांना दिशा देणारा ठरणार आहे. भौतिक विकासाबरोबर शाश्वत विकास महत्वाचा असून तो चिरंतर टिकणारा आहे. छोट्या- छोट्या बाबीतून कल्पना सूचल्या तर त्याचा उपयोग जनसामान्यांना होऊ शकतो, हेच यावरुन दिसून येते.