शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत लेखमालेवर इतिहास व राज्यशास्त्राचे प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 22:03 IST

शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे.

ठळक मुद्देसामान्य ज्ञानात भर : शरदराव पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम

आशिष देरकर।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे.‘लोकमत’ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षाविषयक एक लेखमाला सुरू केली आहे. या लेखमालेमध्ये अर्थशास्त्र, इतिहास, सहकार, नागरीकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इंग्रजी अशा विविध विषयांवर आधारित माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. ही माहिती संकलित करण्याकरिता विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून त्यावर आधारित विविध विषयाचे प्रकल्प तयार करणे सुरू केले आहे.दरवर्षी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयाचे प्रकल्प तयार करावे लागतात. त्याच प्रकल्पाचा भाग म्हणून आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता उपयुक्त असल्यामुळे प्राध्यापकांनी या लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार करण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ते उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सदर माहिती विशेष उपयोगात पडत आहे. त्यामुळे या उपक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.विद्यार्थ्यांना दररोज स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता पुस्तके वाचण्यास सांगितल्यास विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वृत्तपत्र रोज विद्यार्थ्यांच्या हातात पडतात आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे कात्रण करून विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला लावल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. त्यामुळे वाचनाची सवय लागते. ‘लोकमत’ने सुरू केलेली मालिका स्तुत्य असून विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणारी आहे.- प्रा. डॉ. शरद बेलोरकर‘लोकमत’च्या लेखमालेत आलेले कात्रण रोज विद्यार्थी कापून ते पेपरवर चिकटवत आहेत. त्या माध्यमातून वृत्तपत्र वाचनाच्या आवडी सोबतच नवनवीन ज्ञान मिळविण्यात विद्यार्थ्यांना यश मिळत आहे. लोकमतची लेखमाला विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार असून या उपक्रमामुळे युवकांच्या ज्ञानवाढीस चालना मिळत आहे.- प्रा. डॉ. संजय गोरे, गडचांदूररोज काहीतरी नवीन शिकायला मिळत असल्यामुळे आम्ही लोकमत वृत्तपत्र वाचायला लागलो आहे. लोकमतच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मदत होत आहे. या लेखमालेमुळे वृत्तपत्र वाचनाची आवड देखील वृद्धिंगत झाली आहे.- शितल झुरमुरे, विद्यार्थिनी.