शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरातील ऐतिहासिक क्रांती पुलाला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:04 IST

चिमूर-वरोरा मार्गावर असलेल्या क्रांती पुलाला तडे गेल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या पुलाकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. भारतात चिमूर क्रांती प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-वरोरा मार्गावर असलेल्या क्रांती पुलाला तडे गेल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या पुलाकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.भारतात चिमूर क्रांती प्रसिद्ध आहे. ज्या लोखंडी पुलावर भारतीयांच्या रक्ताचा सडा पडला आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांना सळो की, पळो करून सोडले, अशा रक्तरंजित पुलाला तडे गेले आहे. दगडाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा पूल खचण्याच्या मार्गावर आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.ऐतिहासिक पुलाचे जतन होणे गरजेचे आहे. क्रांतीकारकांच्या शौर्याची साक्ष देणारा हा लोखंडी पूल आहे. या पुलाला पाहून कित्येक नागरिकांचे ब्रिटीशांविरुद्ध रक्त सळसळते आणि शुरांची प्रेरणा आपल्याला मिळते. याच पुलाकडे पाहून क्रांतीकारकाच्या बलीदानाची आठवण येते. पुरातन प्रेमी ऐतिहासिक पुलाला दरवर्षी स्वच्छ करून क्रांतीकारकांच्या बलिदानाला उजाळा देतात. नुकतेच येथील पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी पुलाची पाहणी केली असता या पुलाला भेगा गेल्याचे आढळून आले. त्यामुळे हा ऐतिहासिक पूल खचण्याची भिती आहे. पुलाला धोका निर्माण होऊन अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पुलाची डागडुजी करण्याची मागणी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी प्रशसनाकडे केली. यावेळी निखिल भालेराव, ऋषीकेश बाहुरे, संदीप किटे, आशिष ईखारे, क्रिष्णा मसराम, समीर बंडे, पंकज बंडे, मोहन सातपैसे, गोपाल मासूरकर आदी उपस्थित होते.