शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

ऐतिहासिक वारसा इतिहासाचा आत्मा

By admin | Updated: September 26, 2016 01:14 IST

चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत.

अशोकसिंह ठाकूर : इतिहास विभागाचा उपक्रमगडचांदूर : चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत. या स्मारकांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे जतन करण्याची जबाबदारी युवकांची आहे. स्थानिक इतिहासावर संशोधन होण्यासाठी हा ऐतिहासिक वारसा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून ऐतिहासिक वारसा इतिहासाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी केले.शरदराव पवार महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. चर्चासत्राचा विषय ‘इतिहास संशोधनात स्थानिक इतिहासाचे योगदान’ हा होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुळशिराम पुंजेकर, नोगराज मंगरूळकर, प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह, राजेश सिंह आदी उपस्थित होते.संशोधक अशोकसिंह ठाकूर पुढे म्हणाले की, इतिहासात संशोधन करण्यासाठी या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे. याप्रसंगी त्यांनी पी.पी.टी. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची ओळख करून देऊन माहिती दिली. जिल्ह्यातील भटाळा, चंदनखेडा, माणिकगड किल्ला या भागातील ऐतिहासिक वास्तुंची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केला. महाविद्यालयाच्या वतीने अशोकसिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. तर अशोकसिंह ठाकूर यांनी महाविद्यालयाला इतिहासाचे ग्रंथ भेट दिले. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी केले. संचालन निकिता गोहणे यांनी तर आभार दीक्षा आगलावे यांनी मानले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक, प्रा. डॉ. माया मसराम, प्रा. डॉ. जतेंदर सिंह, प्रा. मंगेश करंबे, अशोक नामेवार, सुरेश चांदेकर, सुभाष टेकाम, शशीकांत ढोकणे, प्रफुल गेडाम, विशाल चांदेकर, हरिश्चंद्र पोटे, योगेश महाकुलकर, कपील गोहणे, योगेश चौधरी, आचल आगलावे, नीलेश चौथाले आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)