शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील ऐतिहासिक जुनोना जलमहल नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 11:08 IST

चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन जलमहल पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपुरातत्व विभागाचे दुर्लक्ष स्थळाचा विकास करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन जलमहल पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.चंद्रपूर शहर आणि जिल्हा ऐतिहासिक गोंडकालिन अनेक वास्तुकरिता ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भाच्या भुप्रदेशावर ८०० वर्र्षे राज्य करणारे गोंडराजांनी आपल्या कार्यकाळात किल्ले, मंदिरे, समाध्या, बावडया आदी वास्तुचे बांधकाम केले आहे. त्यापैकीच एक गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांच्या काळात बांधकाम झालेले जुनोना गावाच्या तलावाच्या काठावरील जलमहल आहे. हे जलमहल अजुनही पुरातत्व विभागाचे लक्ष न गेल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इको-प्रो व्दारा जलमहल परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जलमहल वास्तुची पुरातत्व विभागाने नोंद घेऊनसंवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे. सदर परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटन स्थळ विकसीत करण्याची मागणी इको- प्रोने यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे केली.

जलमहलचा इतिहासचंद्र्रपुरात गोंड राज्याची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे ५०० वर्षांपूर्र्वी गोंड राज्याचा कारभार बल्लारपूर येथून सुरू होता. तत्कालिन गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा (इ.स.१४७२ ते १४९७) यांच्या काळात जुनोना तलाव व तलावाच्या काठावर बांधकाम करण्यात आले होते. खांडक्या बल्लाळशहाची प्रकृती लहानपणापासून निरोगी नव्हती. शरिरावर खांडके असल्याने प्रकृती नेहमीच खालावलेली असायची. प्रकृती सुधारणेसाठी राणी हिताराणीने जुनोना जंगलातील तलावाच्या काठावर जलमहल बांधले. यानंतर गोंडराजांनी आपली राजधानी चंद्रपूरला हलविल्यानंतर जुनोना येथील जलमहलचा संदर्भ इतिहासातून वगळण्यात आला. मात्र अजुनही हा परिसर आणी जलमहल सुस्थितीत आहे. जंगल, तलाव व ऐतिहासिक गोंडकालीन जलमहलाची योग्य सांगड घातल्यास चंद्रपूर शहरानजिक निसर्गरम्य पर्यटनकेंद्र तयार होऊ शकते.

टॅग्स :historyइतिहास