शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक जटपूरा गेट उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:17 IST

सतत विकास आणि लोककल्याणाचा ध्यास उराशी बाळगून सेवारत असणारे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे,

ठळक मुद्देथीम लाईटींगच्या कामाचे भूमिपूजन : चांदा ते बांदा योजना प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत विकास आणि लोककल्याणाचा ध्यास उराशी बाळगून सेवारत असणारे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ.नाना श्यामकुळे यांनी केले.चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक जटपूरा गेटवर थीम लाईटींगच्या कामाच्या भूमिपूजन समारंभात आ.श्यामकुळे बोलत होते. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहराला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करू, असेही आ. श्यामकुळे यावेळी बोलताना म्हणाले. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत दोन कोटी ३५ लाख रुपये किंमतीच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाºया ऐतिहासिक जटपूरा गेटच्या थीम लाईटींगच्या कामाच्या भूमिपूजन आ. नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहूल पावडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.चंद्रपूर शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणाºया जटपूरा गेट आता थीम लाईटींगच्या माध्यमातून उजळणार असून विविध दिनविशेष व सणांचे महत्व अधोरेखित करत त्या रंगांची उधळण नेमक्या व बोलक्या स्वरूपात जटपुरा गेटवर प्रतिबिंबीत होणार आहे.अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा विकास प्रकल्प चंद्रपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणार असून त्या माध्यमातून शहराच्या ऐतिहासिक पाऊलखुणा ठळकपणे अधोरेखित होणार आहे. येत्या सहा महिन्यात जटपूरा गेटच्या थीम लाईटींगचे हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाप्रसंगी मनपाचे नगरसेवक तसेच शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.