शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

त्याईचे सरण, अमुचे जळण पाहिले म्या डोळा...

By admin | Updated: December 2, 2014 23:02 IST

कर्नाटक एम्टा कोळसा कंपनीद्वारे कोळसा धुळीच्या रुपाने सरण रचले जात आहे. आम्ही या सरणात जळतो आहो. आमच्या मरणाचा हा दुदैवी सोहळा दररोज आम्ही आमच्या डोळ्यानी पाहतो आहोत.

सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)कर्नाटक एम्टा कोळसा कंपनीद्वारे कोळसा धुळीच्या रुपाने सरण रचले जात आहे. आम्ही या सरणात जळतो आहो. आमच्या मरणाचा हा दुदैवी सोहळा दररोज आम्ही आमच्या डोळ्यानी पाहतो आहोत. हे भावनाविवश उद्गार आहे कोंढावासीयांचे. ज्यांनी कोळशाच्या धुळ प्रदूषणासमोर हात टेकले आहेत.घराच्या टिनावर, स्लॅबवर कोळशाच्या धुळीचा थर, घरात भांड्यावर धुळ, खुंटीला लटकविलेल्या कपड्यांवर धुळ, झोपण्याच्या अंथरुन-पांघरुणावर धुळ, पिण्याच्या पाण्यात, अन्नात धुळ, देव घरावर धुळ या धुळीमुळे कोंढा येथील नागरीक त्रस्त आहेत. मजुरीला जावे की, आयुष्यभर घरातील धुळच पुसत राहावे? असा प्रश्न येथील महिला वर्ग विचारत आहेत.कर्नाटका एम्टा कोळसा कंपनीच्या साईडिंग पर्यंतच्या कोळसा वाहतूकीमुळे धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे की, त्याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. त्वचेचे रोग, दमा, फुफ्फुसाचा तसेच विविध आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहे. सततच्या कोळासा धुळीमुळे सकाच्यावेळी थुंकीतून चिकट काळे ठसे बाहेर पडत असल्याची धक्कादायक बाब ग्रामस्थानी सांगितली. या भयानक परिस्थितीला समोरे जाताना दररोज स्वत:चे मरण स्वत:च पाहत असल्याची भावना कोंढावासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधींनी प्रत्यक्ष कोंढा गावाला भेट दिली असता, ग्रामस्थांनी आपबिती कथन केली. याप्रसंगी सरपंच प्रविण गोंडे, ज्ञानेश्वर मत्ते, बंडू बावणे, विजय विरुटकर, रामचंद्र शेडामे, महादेव काकडे उपस्थित होते. रस्त्यावरील धुळीने गेला अनेकांचा जीवकोंढा पाटी ते साईडिंग पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नाही. नियमानुसार २० टनच्यावर कोळसा वाहतून करण्याची परवानगी नाही, असे उपविभागीय अभियंता सा.बां. उपविभाग भद्रावती यांचे लेखी पत्र आहे. परंतु, रस्त्यावरुन कोळशाची ओव्हरलोड वाहतूक होत आहे. ग्रामस्थानी आंदोलन केल्यानंतर देखाव्यासाठी पोलीस दोन ते चार वाहनांवर कारवाई करतात. वातावरण शांत झाले की पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी स्थिती होते. रस्त्यावर इतके खड्डे आहेत की खड्ड्यात अर्धाफूट धुळ साचते. पायी चालत गेल्यात पाय फसतात. याच रस्त्यावर येथील माजी पोलीस पाटील राघोबा वैद्य मरण पावले. बंडूजी बावणे यांची मुलगी शुभांगी अपघातात मरण पावली. याव्यतिरिक्त आठ ते दहा जणांचा या रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला आहे.