शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच दराने गृहकर आकारणी करा

By admin | Updated: May 15, 2016 00:44 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गृहकराचे निर्धारण करण्यात आले असल्याने ...

चंद्रपुरात बैठक : मनपा आयुक्तांना हंसराज अहीर यांचे निर्देश चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गृहकराचे निर्धारण करण्यात आले असल्याने गृहकर वाढीचा प्रस्ताव हा महानगरातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. या प्रस्तावावर कार्यान्वयन न करता विद्यमान कालावधीत जो कर आकारण्यात येत आहे, तोच गृहकर २०१७ पर्यंत लागू करण्याचे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाला दिले आहेत.स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर, आयुक्त व अन्य खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलावून चर्चा केली व बैठकीत निर्देश दिले. महापौर, उपमहापौर, आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांना बोलावून घेतलेल्या बैठकीत निर्देश दिल्याने नागरिकांचा गृहकरासंबंधीचा प्रश्न सुटणार आहे. या बैठकीला महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, आयुक्त सुधीर शंभरकर, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजपा गटनेते अनिल सफुलझेले, नगरसेवक धनंजय हूड, भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ आदींची या बैठकीस प्रामुख्याने उपस्थिती होती.सन २०१२ ते २०१७ पर्यंत निर्धारित केलेला गृहकर लागू ठेवणे क्रमप्राप्त असताना त्यात वाढ करण्याचे हल्लीच प्रयोजन नव्हते, अशी भुमिका ना. अहीर यांनी बैठकीत घेतली. चटई क्षेत्र वाढले नसताना किंवा घराच्या बांधकामात वाढ झाली नसतानाही घरटॅक्स वाढीचा निर्णय अयोग्य होता. त्यामुळे हा गृहकर पूर्वीच्याच दराने भरण्याची मुभा नागरिकांना व वाणिज्यिक प्रतिष्ठानांना दिली जावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. ज्यांना पूर्वीचा घर टॅक्स लागू झाल्यानंतर नव्याने बांधकाम केले किंवा ज्यांच्या बांधकामाचे क्षेत्रफळ वाढले असेल तर अशांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. (स्थानिक प्रतिनिधी)