शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

कोरपना तालुक्यातील महामार्ग बनले ‘मृत्युमार्ग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:43 IST

कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावर जीवघेणे खड्डे : निधीच्या तरतुदींचा केवळ देखावा

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यावाचून नाही. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निधींची तरतुदही करण्यात आली. परंतु, कागदापलीकडे काहीही दिसत नाही. रस्त्याची थातूरमातूर डागडूजी करण्यात आली. या मार्गावरुन प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाºया प्रमुख राज्य महामार्ग क्र. १० नांदेड-मुखेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-स्टेट बॉर्डर-कोरपना-राजूरा-जुनोना-चिचपल्ली-गडचिरोली ते राज्य सीमेला जानेवारी महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी मध्ये परावर्तीत करण्यात आले. यापूर्वीपासून या महामार्गावर खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आजघडीला आदिलाबाद- कोरपना- राजूरा-बामणी- गोंडपिपरी- आष्टी राष्ट्रीय महामार्गादरम्यान एकट्या कोरपना तालुक्यातील महामार्गाच्या लांबीत राजुरा तालुका सीमा ते राज्यसीमेच्या पट्ट्यात अनेक मोठ्या स्वरूपातील तर शंभरावर अधिक छोटे-मध्यम खड्डे निर्माण झाले आहे. रस्त्याच्या बाजूच्या कडाही पुरत्या दबल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे अतिशय जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे सद्या या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणणे म्हणजेच धाडसाचे होईल.महाकुर्ला- धानोरा- भोयगाव-गडचांदूर- देवाडा, राळेगाव- वणी-वनोजा- अंतरगाव- गडचांदूर, कोरपना- वेळाबाई- मुकुटबन- पारवा (वणी मार्ग), गडचांदूर- सोनापूर-जिवती राज्य महामार्ग खड्ड्यांचे गचक्याने गेल्या दोन दशकांपासून सहन करत आहे. भोयगाव ते कवठाळा फाट्याच्या दरम्यान मार्गावर पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. वनसडी- नारंडा-कवठाळा फाटा-पौनी प्रमुख जिल्हा महामार्गाची दशा याहून वेगळी नाही. कोरपना-धनकदेवी-जिवती या मार्गाचे कामही अत्यंत कासवगतीने सुरू आहे. यातील बहुतांश झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आदिवासी बहुल व अतिदुर्गम समजल्या जाणाºया या भागाचे चांगल्या रस्त्याचे स्वप्न अजूनही अधांतरीच आहे. कोरपना-कन्हाळगाव- सावलहिरा- येल्लापूर हा मार्गही अनेक दशकांपासून रखडलेलाच आहे. आजही येथील नागरिकांना पायीच जाणे हाच पर्याय आहे. याचबरोबर कोरपना- गांधीनगर-कोडशी (बु), जांभूळधरा- रूपापेठ, कोरपना- हातलोणी- घाटराई, आवारापूर- कढोली- नारंडा, नादा-बाखर्डी, रामपूर- खिर्डी- वडगाव-इंजापूर, कोठोडा- रायपूर- परसोडा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.ग्रामीण रस्तेही उपेक्षिततालुक्यातील कोरपना-कन्हाळगाव-कुसळ, कोडशी(बु)-कोडशी(खु) जेवरा-गांधीनगर, पिपरी-झोटींग-वनोजा, अंतरगाव-सांगोडा फाटा, सावलहिरा-टांगाळा, कन्हाळगाव-चनई-मांडवा, शेरज (खु)- पिपरी, लोणी, कातलाबोडी- सोनूर्ली-चिंचोली रस्त्याचेही भोग अद्यापही संपले नाही. त्यामुळे या रस्त्यांचेही भाग्य कधी उजळणार, हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.खड्ड्यांमुळे चार महिन्यांपासून बसेस बंदभोयगाव मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांंमुळे कोरपना, पेल्लोरा, भोयगाव, गडचांदूर, कवठाळा आदी बसेस बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दोन दशकांपासून या रस्त्याची अवस्था कमी अधिक अशीच आहे. मात्र आश्वासनांच्या पलीकडे रस्त्याचे एक किलोमीटरही दुरुस्तीचे काम झाले नाही.