शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणींमुळे चंद्रपूरने गाठला तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:11 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे.

ठळक मुद्देदिवसेंदिवस तापमानात वाढ । ब्लॅक गोल्ड सिटीला उष्णतेची झळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. कोळसा खाणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याने तापमानाचा उच्चांक गाठल्याने उन्हाळ्यात जनजीवन प्रभावित होत आहे.चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर परिचित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसाचे जाळे असल्याने वेकोलिने जिल्ह्याच्या बहुतांश भागात खुल्या व भूमिगत कोळसा खाणी निर्माण केल्या. चंद्रपूर व राजुरा तालुका तर वेकोलिच्या कोळसा खाणींसाठी अग्रेसर मानला जातो. दुर्गापूर, रयतवारी, पद्मपापूर, गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या परिसरात कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कोळशामुळे येथील वातावरण नेहमीच उष्ण असते. सध्या तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सीअसच्या पार गेला आहे. नागरिकांना सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पूर्वी एवढे तापमान नव्हते. परंतु खदानीमुळे आता परिसर अधिकच उष्ण झाला आहे.खाणींमध्ये वर्षभर उष्णतावेकोलिच्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळशाची उष्णता असते. वर्षभर येथील वातावरण उष्ण असते. त्यामुळे बाहेरच्या वातावरणावरही त्याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवतो. कोळसा खाणीत उन्हाळ्यात तर भीषण परिस्थिती असते. खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे या कालावधीत मोठे हाल होतात. तीव्र उष्णतेचा त्यांना सामना करावा लागतो. खाणीजवळच्या गावातही उष्णतेचा कहर असतो.कोळसा खाणी निर्माण होण्यापूर्वी गोवरी - सास्ती परिसरातील वातावरण थंड होते. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे आता या परिसरात वर्षभर उष्णता असते. खाणींच्या दुष्परिणामांचा फटका नागरिकांना बसत आहे. - मारोती पाटील लोहे, गोवरीचंद्रपूरच्या परिसरात कोळसा खाणींचे जाळे पसरले आहे. वीज केंद्र आहे. यामुळे वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड, मिथेन यारखे वायू पसरत असल्याने तापमानात वाढ होत आहे.- प्रा. योगेश दुधपचारे, चंद्रपूर

टॅग्स :Temperatureतापमान