शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धानोरातील हेमाडपंथी मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: January 9, 2017 00:37 IST

चंद्रपूर तालुक्याच्या ठिकाणापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर दोन हजारावर लोकवस्तीचे धानोरा (पिपरी) गाव आहे.

अस्तित्व धोक्यात : पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारकाकडे दुर्लक्षअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरचंद्रपूर तालुक्याच्या ठिकाणापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर दोन हजारावर लोकवस्तीचे धानोरा (पिपरी) गाव आहे. वर्धा नदीच्या तिरावरील या गावात पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्या अत्यंत कोरीव व देखण्या मूर्ती आहेत. पंचक्रोशीत गावकऱ्याचे कुलदैवत म्हणून ओळख आहे. नागपूर विभागात पुरातत्व विभागाने या मंदिराला संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले आहे. मात्र या स्मारकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ब्रम्हा, विष्णू व महेश या मूर्र्तींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. धानोरा (पिपरी) येथील पुरातन हेमाडपंथी मंदिर नामशेष होण्याच्या माार्गावर आले आहे.धानोरा (पिपरी) गावात शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. येथील नागरिक नागपंचमीला येथे पूर्वी पूजा-अर्चा करुन कुलदैवताचे नामस्मरण करीत होते. ब्रम्हा, विष्णू, महेशच्या चरणी नतमस्तक होवून मनोकामना पूर्ण करीत होते. वर्धा नदी जवळ असल्याने हेमाडपंती पुरातन मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे. गावकऱ्यांचे भक्ती भावाने दर्शन घेण्याचे मंदिर चांगले असावे म्हणून जिर्णोधार करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला. मात्र पुरातत्व विभागाची अडचण समोर आली. संरक्षित स्मारक म्हणून कोणतेही काम करण्यास मज्जाव करण्यात आला. येथील नागरिकांनी आपआपली सुख, दु:ख ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या साक्षीने अनुभवली. पिढ्यानपिढ्या मनोभावे पुजा अर्चना, कीर्तन करुन मनोकामना जपली. त्याच कुलदैवताची दुर्दशा गावकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. याला कारणीभूत पुरातत्व विभागाचा दुर्लक्षितपणा असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने धानोरा येथील पुरातन हेमाडपंथी मंदिराला संरक्षीत स्मारक म्हणून केवळ फलक लावला. त्यावर प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा १९५८ अंतर्गत हे स्मारक राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित केले असून सुधारणा व वैधता कायदा २०१० नुसार प्रतिबंधीत केले आहे. १०० ते २०० मीटर पर्यंत कोणतेही खोदकाम, बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी गावकऱ्यांच्या भावनेला आळा बसला आहे.पुरातत्व विभाग हेमाडपंथी मंदिराच्या अवशेषाकडे दुर्लक्ष करीत असून संरक्षित स्मारकाला गत वैभव प्राप्त करुन देण्यास काहीच हालचाल करीत नाही. यामुळे पुरातन हेमाडपंथी शंकराचे व ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिर सद्यस्थितीत अडगळीत पडले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे पुरातन मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर असून मंदिराची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच हरिभाऊ गोखरे व उपसरपंच उत्तम आमडे यांनी केली. मंदिराला गत वैभव मिळावेधानोरा गावात सर्वात जुणे शंकराचे व ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिर आहे. पुरातन मंदिराचा जिर्णोधार करण्याचा व नव्याने मूर्तीच्या संरक्षणासाठी व अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बांधकाम अपेक्षित आहे. ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग केवळ फलक लावून मोकळा झाला. यामुळे भाविकात नाराजी आहे. पुरातन हेमाडपंथी मंदिरापुळे गावाचे मोठेपण सिद्ध होणार असून वास्तुचे जतन होणे गरजेचे आहे.- नंदू वासाडे, माजी संचालक कृउबा समितीदर्शनाला ठरत आहे धोकादायकगावातील शंकराचे व ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिर जीर्ण झाले आहे. यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी जीव मुठीत घेवून गाभाऱ्यात जावे लागते. अत्यंत कोरीव व सुरेख मूर्र्तींचे अवशेष लुप्त होण्याच्या माार्गवर आहेत. नागपंचमीला दर्शनासाठी मोठी गर्दी मंदिर परिसरात होते. एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे पुरातत्व विभागाने मंदिराच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.- विजय आगारे, सामाजिक कार्यकर्ता, धानोरा