शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’ उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू

By admin | Updated: May 28, 2017 00:43 IST

एका युवतीला दुर्धर आजाराच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. तिच्या उपचाराकरिता तिचा भाऊ धडपड करीत आहे.

मदतीचा हात : ‘लोकमत’च्या वृत्ताची ठाणेदारांनी घेतली दखल आशिष घुमे । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : एका युवतीला दुर्धर आजाराच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. तिच्या उपचाराकरिता तिचा भाऊ धडपड करीत आहे. मात्र, त्याची धडपड अपूर्ण आहे. वरोराच्या ठाणेदारांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत १० हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच प्रहार संघटनेने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही साथ दिली आहे.‘लोकमत’ने ‘बहिणीच्या उपचारासाठी भावाची धडपड’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर वरोरा येथील ठाणेदार विलास चव्हाण यांनी बहिणीच्या उपचाराला मदत म्हणून रवी पाटील यांना १० हजार रुपयांची मदत केली. तर आ. बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेतर्फे त्यांची मुंबई येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली . वरोरा शहरातील रहिवासी होमगार्ड रवी पाटील यांची आपल्या बहिणीच्या उपचारकरिता सुरु असलेली धडपड पाहता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्तामध्ये सामाजिक संघटनांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेकजण दानशूरपणा आणि मदत करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांनी यावेळी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे शहरात सामाजिक कार्यकर्त्यांची, समाजसेवकांची वानवा निर्माण झाल्यासारखी परिस्थिती दिसत होती. अशा वेळी वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांमाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. त्यांनी स्वत: १० हजार रुपये रवी पाटील यांना बहिणीच्या उपचारासाठी दिले. रवी पाटील यांची बहीण निशा प्रमोद मैती रा. चंद्रपूर ही दुर्धर अशा ‘बोनमॅरो’ या आजाराने त्रस्त आहे. तिचा भाऊ रवी पाटील बोनमॅरो दान करणार आहे. त्या शस्त्रक्रियेसाठी व औषधोपचारासाठी त्यांना १० लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्यांच्याकडे असलेले किडूकमिडूक पैसे उपचारावर खर्च केले. तसेच ते कर्जबाजारीही झाले. पण आता पुढील उपचारकरिता काय करावे, असे संकट त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. पैसे नसल्याने रवी पाटील यांनी पैशासाठी अनेकांकडे हात पसरविला. पण निराशेशिवाय त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यांच्या बहिणीची तब्बेत २१ मे रोजी अधिकच खालावल्याने तिला चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीमुळे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या सामाजिक जाणिवा जागृत झाल्या. त्यांनी मुबई येथील एका रुग्णालयात तिचा अत्यंत कमी खर्चात उपचार होईल, यासाठी प्रयत्न केले. तिची प्रकृती बघता तिला लवकरात लवकर मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. रवी पाटील यांनी मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनामदत मागितली. पण कोणीही पुढे आले नाही. ही बाब माहिती होताच प्रहारचे विदर्भ प्रमुख गजानन कुबडे यांनी मुंबई येथे त्यांची राहाण्याची व्यवस्था करून दिली असून ते मुंबई येथे रवाना झाले आहे. दुसऱ्या दिवशी वरोराचे ठाणेदार चव्हाण यांनी स्वत:जवळील १० हजार रुपये दिले . सध्या निशा मुंबई येथे उपचार घेत असून पैशाअभावी तिचा उपचार थांबलेला आहे. पाटील यांनी सामाजिक संस्था व दानशुरांकडे मदतीची मागणी केली आहे.