सिंदेवाही : शहरातील इंदिरानगर येथील अश्पाक शेख व त्याची पत्नी रुकसाना शेख यांनी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी करून वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मागील नऊ वर्षापासून घरगुती भांडणामुळे अलग राहत होते. त्यांना ११ वर्षाची मुलगीसुद्धा आहे. सिंदेवाही पोलीस निरीक्षक योगेश घारे तथा नगरसेवक युनूस शेख यांनी दोन्ही कुटुंबाला एकत्र बोलावून त्यांचे समुपदेशन केले. त्याच्यात समझोता करून अलग झालेल्या कुटुंबाला एकत्र जोडले.
यामुळे त्यांच्या ११ वर्षे वयाच्या मुलीच्या चेहऱ्यावर आपल्या आई-वडिलांसोबत राहण्याचा आनंद दिसून येत होता. सिंदेवाही पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून नऊ वर्षांनी अलग असलेल्या एका कुटुंबाला एकत्र आणले. रोज पोलीस आणि न्यायालयात जाऊन कुटुंब त्रासून गेले होते.