शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मनोरे उभारताना शेतकऱ्यांना लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:54 IST

भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरात बैठक : सुधारणा करा- धानोरकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. परंतु अधिसूचना ही त्रुटीपूर्ण व नुकसानग्रस्तांसाठी अन्यायकारक आहे, याकडे आ. बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांचे लक्ष वेधले.नुकसानग्रस्त शेतकºयांवरील अन्याय टाळण्यासाठी वीज मनोरे उभारताना शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत करून विविध सुधारणा सुचविल्या.मनोरे उभारतांना अधिग्रहीत करण्यात येणारी जमीन ही मूळ पायासकट मोजणी करावी, त्याचा मोबदला हा मुख्य नोंदणी महानिरीक्षकाच्या नियमाप्रमाणे संभाव्य अकृषक वाणिज्य दरानुसार देण्यात यावा, मनोरे उभारताना व त्यानंतर २५ वर्र्षांपर्यंत देखभालसाठी वापरात असलेल्या शेतकºयांच्या जमिनीचा जो वापर जमिनी करतील त्याचा मोबदल्याविषयी अधिनियमात समावेश करावा, शेतातून जी विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे. त्याची पाहणी परिसर (लाईन कॉरीडोअर) च्या मापदंडानुसार निर्धारीत करावी, त्याप्रमाणे नुकसान भरपाई ही मुख्य महानिरीक्षक यांच्या संभाव्य अकृषण वाणिज्य वापराच्या दराने देण्यात यावी, सध्याची प्रस्तावित १५ टक्के जमिनीमध्ये वाढ करून ती कॉरीडोअर क्षेत्राला लागू करण्यात यावी.प्रस्तावित मनोऱ्यांमध्ये कंपनीमार्फत काही बदल झाल्यास नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतामध्ये कंपनीतर्फे काही सिव्हिल काम केल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमामध्ये काही तरतूद नाही त्यामुळे शेतकरी हा भरपाईपासून वंचित राहतो. अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत या नियमात नुकसान भरपाईची तरतूद करावी, या सुधारणांवर चर्चा केली.बैठकीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून सचिन सोनटक्के, राजू गोखरे, सुनील गोखरे, संदीप लोहे, शेंडे, वर्भे, शिवसेना पदाधिकारी प्रमोद मगरे, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, प्रवीण काकडे, भोजराज झाडे, प्रफुल्ल पुलगमकर आदी उपस्थित होते.