शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

तप्त उन्हात वीज वाहिनी केली दुरूस्त

By admin | Updated: May 30, 2016 01:11 IST

६६ केव्हीची वीज वाहिनी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुटली. सर्वत्र धावपळ सुरू झाली. यामुळे वरोरा तालुक्यातील ग्रामीण भाग कित्येक तास अंधारात राहील, अशी शंका होती.

पाच तास परिश्रम : वरोरा उपविभागातील गावे राहणार होती अंधारात वरोरा : ६६ केव्हीची वीज वाहिनी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुटली. सर्वत्र धावपळ सुरू झाली. यामुळे वरोरा तालुक्यातील ग्रामीण भाग कित्येक तास अंधारात राहील, अशी शंका होती. मात्र उष्ण तापमानात वरोरा वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत येणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान करून चार तासात वीज वाहिनी दुरूस्त केली आणि वीज पुरवठा सुरू झाला. वरोरा-नंदोरी या ६६ केव्ही वीज वाहिनीचे तार अचानक तुटले. याच वीज वाहिनीवर ३३ केव्ही खांबाडा, ३३ केव्ही टेमुर्डा या उपकेंद्रांना वीज पुरवठा करण्यात येतो. ६६ केव्ही वीज वाहिनी ठप्प झाल्यास त्यावर विसंबुन असणाऱ्या ३३ केव्ही व ११ केव्ही वीज वाहिन्या ठप्प होत असतात. त्यामुळे वरोरा उपविभागातील अनेक गावे विद्युत पुरवठ्याअभावी प्रभावित होणार असे मानले जात होते. सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने तापमानात तुटलेल्या वीज वाहिनीला सुरळीत कसे करणार, अशी शंका व्यक्त होत होती. परंतु वरोरा वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागातील उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळावर धाव घेतली. त्यांच्यासोबत वाघदरे, कनिष्ठ अभियंता रावत, शुभम मस्के, शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता तुटलेली ६६ केव्ही वीज वाहिनाी अथक परिश्रम करून अवघ्या पाच तासात दुरुस्त करून खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (तालुका प्रतिनिधी)