शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 10, 2016 00:39 IST

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.

बोडी-तलावात पाणी साठले : पेरण्यांच्या कामांना अचानक वेगमूल: पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.आजच्या स्थितीत धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून उर्वरित पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. तसेच धानाच्या पिकाला जोड म्हणून पर्यायी पिकालासुद्धा शेतकऱ्यांनी पसंती दर्शवित कापूस, तुर, सोयाबीन, भाजीपाला याचादेखील पेरा पूर्ण केल्याचे दिसून येते. यावर्षी १६० हेक्टरवर आवत्याची पेरणी झाली आहे, हे विशेष!मूल तालुक्यात दोन नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. यावर्षी भरपूर पाऊस येणार ही हवामान खात्याची भविष्यवानी खोटी ठरणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना वेळोवेळी सतावत होता. मात्र प्रथमत: ३ जूनला ३६.८ मिमी पाऊस पडून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कमी-अधीक प्रमाणात पाऊस पडल्याने आजच्या स्थितीत ४५७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून येते. काही शेतकऱ्यांनी चिखल पऱ्हे टाकण्यास पसंती दर्शविली तर काहींनी आवत्या धानाच्या पेऱ्याला पसंती दिल्याचे दिसते. तालुक्यातील पिकाखाली क्षेत्र २४ हजार हेक्टर असून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ७६० हेक्टर आहे. आजच्या स्थितीत ९ हजार ४५० हेक्टरसाठी धानाचे पऱ्हे १०५० हेक्टर पेरण्यात आले. एकंदरीत ९० टक्के धानाच्या पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी तूर २१० हेक्टर, सोयाबीन ७९९ हेक्टर, कापूस १७० हेक्टर, भाजीपाला १५ हेक्टर, लागवड केली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत जलशिवार योजनेअंतर्गत मृद संधारण कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.मूल तालुक्यात मागील वर्षी १११ गावांपैकी मोजक्या गावातच धानाचे पिक झाले. उर्वरित गावामध्ये दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली. मात्र दुष्काळाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच पिकविम्याची रक्कमदेखील देण्यास शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सतत दोन वर्षे मूल तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित होत असल्याने शेतकऱ्यात असंतोष दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)