शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नागरकरांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

By admin | Updated: November 16, 2014 22:46 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान नेहमीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस पक्षाने काढलेले व्हीप झुगारून यापूर्वी नंदू नागरकर स्थायी समिती

महापालिकेकडे सर्वांचे लक्ष : राजकीय समीकरण मात्र बदललेलेचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान नेहमीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस पक्षाने काढलेले व्हीप झुगारून यापूर्वी नंदू नागरकर स्थायी समिती सभापती झाले होते. त्यानंतर नंदू नागरकर हे पक्षात स्थायी होऊन जबाबदारीच्या पदावर कार्यरत झाले. मात्र काही दिवसांपूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे गटनेते संतोष लहामगे व काही सदस्यांनी पक्षाचा व्हीप झुगारला. आता अशा विचित्र परिस्थितीत संतोष लहामगे यांनीच नंदू नागरकर यांना अपात्र ठरविण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या याचिकेवरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूरला महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापौर पदी काँग्रेसच्या संगिता अमृतकर यांची वर्णी लागली. त्यानंतर जून २०१२ मध्ये स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीने रामु तिवारी यांना उमेदवारी दिली होती. या आघाडीत एकूण ३८ नगरसेवक असून गटनेते म्हणून संतोष लहामगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या आघाडीतील नंदू नागरकर यांनीही रामू तिवारी यांना उमेदवारी दिली असतानाही सभापतीपदासाठी आपले नामांकन दाखल केले. गटातील काही नगरसेवकांना हाताशी धरून विरोधकांच्या पाठिंब्यावर सभापती म्हणून निवडूनही आले. रामू तिवारी हे पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांनाच मतदान करण्यात यावे, यासाठी गटनेते संतोष लहामगे यांनी व्हीप जारी केला होता. मात्र या व्हीपला न जुमानता पक्षातीलच नगरसेवक प्रदीप डे, लता साव, संगिता पेटकुले यांनी नंदू नागरकर यांना मतदान केले होते. या प्रकारामुळे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या सूचनेवरून गटनेते संतोष लहामगे यांनी दोन वर्षांपूर्वी नंदू नागरकर आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांविरुध्द नागपूर विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करून अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.मात्र नागरकर हे तल्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यावेळी राजकीय दबावामुळे हे प्रकरण आयुक्त कार्यालयात धूळखात पडून होते.दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समिकरणच बदलून गेले. संजय देवतळे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे ते भाजपवासी झाले. त्यामुळे चंद्रपुरातील त्यांचे समर्थक नागरकर यांनी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याशी जुळवून घेणे सुरू केले.त्यानंतर सुनिता लोढिया यांची महापौर पदावर वर्णी लावण्यासाठी नागरकर यांनी मोर्चेबांधणी केली व पुगलिया गटाच्या नगरसेवकांसोबत हातमिळवणी केली. परंतु मधल्या काळात गटनेते संतोष लहामगे, रामू तिवारी यांचे महापालिकेतीलच एका प्रकरणावरून पुगलिया गटांशी पटेनासे झाले. पुगलिया गटापासून वेगळे होत त्यांनी काही नगरसेवकांना सोबत घेऊन आपली वेगळी चुल मांडली. त्यामुळे पहिल्यांदाच महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालण्यात आले. सुनिता लोढिया काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार असल्याने त्यांना मतदान करण्यात यावे, असा व्हीप खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जारी केला होता. मात्र गटनेते संतोष लहामगे यांचाच आदेश पाळत गटातील नगरसेवक निवडणुकीच्या एक दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राखी कंचर्लावार यांच्या पाठिशी उभे राहिले. परिणामी काँग्रेसच्या सुनिता लोढिया पराभूत झाल्या. आता नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. महापालिकेत असलेल्या काँग्रेस पक्षाचे सध्या समिकरणच बदलले आहे. अशा विचित्र परिस्थितीत उद्या सोमवारी गटनेते संतोष लहमागे यांनी दोन वर्षांपूर्वी नंदू नागरकर, संगिता पेटकुले, लता साव व प्रदीप डे यांच्याविरुध्द विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)