यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनारकर, निवासी वैद्यकिय अधीक्षक (बाह्यसंपर्क) डॉ. हेमचंद कन्नाके, बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल भोंगळे, डॉ. धवस आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनातर्फे ३१ जानेवारी या दिवशी पोलिओ मोहीम भारतात एकाच वेळी राबविण्यात येत आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनीही बालकाला पोलिओ डोज पाजला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सीईओ राहुल कर्डिले यांनी पोलिओ मोहिमेचे महत्त्व विशद करून पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी पोलिओ लसीकरणाची माहिती दिली. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांनी संचालन केले. यशस्वीतेकरिता जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सुभाष सोरते, छाया पाटील, चंदा डहाके, एएनएम, शोभा भगत, पीएचएन व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
आजपासून घरोघरी जाऊन बाळांना लसीकरण
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येत आहेत. अनावधानाने पोलिओ डोस मिळाला नाही, अशा बाळांसाठी १ ते ३ फेब्रुवारीपर्यंत ग्रामीण भागात व ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत शहरी भागात आयपीपीआयअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी पोलिओ डोस देणार आहेत.