शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात गुरुवारपासून आरोग्य महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:53 IST

केंद्र सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सदृढ आरोग्यासाठी येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १७ व १८ जानेवारी रोजी रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरात सुमारे १२ हजार रुग्णांना सेवा देण्याचा मानसही ना. अहीर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे१२ हजारांवर लोक येणार : औषधोपचार व शस्त्रक्रियाही होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सदृढ आरोग्यासाठी येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १७ व १८ जानेवारी रोजी रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरात सुमारे १२ हजार रुग्णांना सेवा देण्याचा मानसही ना. अहीर यांनी व्यक्त केला.१७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते या महामेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे उपस्थित होते.१७ जानेवारीला मिळणाऱ्या सेवाहृदयरोग. मधूमेह, मुत्रपिंडाचे आजार, अस्थिरोग, मानसिक आजार, मिरगी, चर्म्ररोग, एचआयव्ही/एड्स, कान, नाक, घसा, नेत्र, गर्भाशयाचे आजार या आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व औषधोपचार संपूर्ण आयुष चिकित्सा (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी व उपचार. रक्त, सिकलसेल / थॅलेसेमिया, शुगर, इ.सी.जी. या तपासणी लहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचारमॅमोग्राफी मशीनद्वारे महिलांची स्तन कॅन्सर तपासणी व उपचारगंभीर आजारासाठी संदर्भ सेवा व शस्त्रक्रियेची सुविधाआरोग्य विषयक समस्या व शंकेबाबत सल्लामसलत व मार्गदर्शन, चर्चासत्र. विविध आरोग्य विषयक प्रदर्शन१८ जानेवारीला मिळणाऱ्या सेवालहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचारलहानमुलांमधील मधूमेह तपासणी व उपचारमधूमेहग्रस्त मुलांच्या पालकांसाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शनरक्त, सकलसेल/थॅलेसेमिया, शुगर व इ.सी.जी. तपासणी होईल.