शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी ५ कोटी ६४ लाख रु निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 13:38 IST

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची चंद्रपूर जिल्हावासियांप्रति कळकळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना अधिक सक्षम व्हावे, नागरिकांना सोईसुविधा तातडीने उपलब्ध होण्याकरिता पालकमंत्री यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पालकमंत्री यांनी स्व अधिकाराचा वापर करत पुनर्नियोजनाद्वारे जिल्हा नियोजन समितीतुन ५ कोटी ६४ लाख रुपये निधी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला तात्काळ उपलब्ध करून दिला आहे. या रकमेतून आवश्यक असणारे बेड, व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर, आयसोलेशन आणि संबंधित इतर साहित्य लवकरात लवकर खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.याप्रसंगी विजय वडेट्टीवार सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदरात औषधे, साधनसामुग्री, यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ३ कोटी रुपये, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २ कोटी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य आणि ओषधे खरेदी करण्यासाठी ६४ लक्ष ७८ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांचे निजंर्तुकीकरण करून संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरिता सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचे पालकमंत्र्यांनी यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, अशी विनंती करत काळजी घ्या सतर्क राहा आणि सहकार्य करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस