शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:28 IST

कुठलीही पूर्व सूचना न देता दीडशे कामगारांना कामावरून कमी केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी वर्धा पॉवर जनरेशन या वीज निर्मिती करणाºया कंपनीत घडला.

ठळक मुद्देवर्धा पॉवर येथील कामगार : अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कुठलीही पूर्व सूचना न देता दीडशे कामगारांना कामावरून कमी केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी वर्धा पॉवर जनरेशन या वीज निर्मिती करणाºया कंपनीत घडला. त्यामुळे कामगारांनी संघटित होऊन कंपनी प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले. मात्र कुठलाही तोडगा न निघाल्याने ७ नोव्हेंबरपासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या दुसºया दिवशी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जागेची परवानगी नसल्याच्या कारणावरून आंदोलन उधळण्याचा डाव प्रशासनाकडून करण्यात आला.शहरालगत असणाºया एमआयडीसी मधील साई वर्धा पॉवर या वीज प्रकल्पातील दीडशे कामगारांनी बुधावरी एकदिवसीय साखळी उपोषण केले. तर आज गुरूवारी ५० कामगारांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली. मात्र यातील आशिष ढवस, विजू दातारकर, अतुल कुकुटकर, जयंत धकने, गजानन मानकर, मारोती ुडुडुरे, मुनेश्वर आगलावे या ७ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे.ज्या जागेवर कामगारांनी उपोषण सुरु केले, ती जागा एमआयडीसीच्या मालकिची असल्याने आंदोलन उधळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप प्रहारचे अमोल डुकरे यांनी केला आहे .