शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेला रिक्तपदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:13 IST

राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्तपदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील तब्बल ३०० च्यावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा पुरती खिळखिळी झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देरूग्णांना अडचणी : महत्त्वाच्या रूग्णालयांत पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्तपदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील तब्बल ३०० च्यावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा पुरती खिळखिळी झाल्याचे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ९ अ‍ॅलोपॅथीक दवाखाने, १० आर्युवेदीक दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये आहेत. यापैकेी ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये चारही संवर्गातील ९२० पदे मंजूर आहेत. यातील केवळ ५१३ पदे भरण्यात आली असून ३०७ पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. तर आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचीही हीच अवस्था आहे.रिक्त पदांमध्ये एकाच अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. याचा त्रास रूग्णांना प्रचंड प्रमाणात सहन करावा लागत आहे.रूग्ण दाखल झाल्यास डॉक्टर उपस्थित राहत नाही, डॉक्टर असेल तर दुसरे कर्मचारी राहत नाही, अशी स्थिती जवळपास अनेक रूग्णालयात दिसून येते. त्यामुळे रूग्णावर वेळेवर उपचार होवू शकत नसल्याचेही प्रकार घडले आहेत.वरोरा, चिमूर व मूल या तीन उपजिल्हा रूग्णालयात वर्ग १ चे ३ पदे मंजूर असून एकच पद भरण्यात आले आहे. वर्ग २ च्या २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या ९५ पदांपैकी ३४ तर वर्ग ४ च्या ४६ पदांपैकी २५ पदे रिक्त आहेत. तर दहा ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ चे १० पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३१ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या १५४ पदांपैकी ४४ तर वर्ग ४ च्या ७० पदांपैकी २० पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरून आरोग्य सेवा बळकट करण्याची मागणी होत आहे.रूग्णवाहिका आहेत, मात्र चालक नाहीतीन उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयासाठी १०२ क्रमांकाच्या ३० रूग्णवाहिका आहेत. मात्र चालकाचे २० च्या जवळपास पदे भरली असून जिल्हा सामान्य रूग्णालयात, तसेच उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयात चालकाची पदे रिक्त आहेत. तसेच १०८ क्रमांकाच्या २१ रूग्णवाहिका असून याही रूग्णावाहिकांना चालक नाही.