शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागही आता ‘टिकटॉक’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:37 IST

कोरोनाच्या काळात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी तसेच आरोग्य विभागाची कोरोनाविषयीची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आता टिकटॉक या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोनाविषयक जनजागृतीसाठी वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्यांकडून विशेषत: किशोरवयीनांकडून होणारा टिकटॉक या मनोरंजक समाजमाध्यम अ‍ॅपचा मोठया प्रमाणात वापर पाहून राज्याच्या आरोग्य विभागालाही ते वापरण्याचा मोह आवरता आला नाही. कोरोनाच्या काळात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी तसेच आरोग्य विभागाची कोरोनाविषयीची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आता या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट आणि ट्विटर या डिजिटल माध्यमांचा वापर करून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येत आहे.राज्याच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या प्रसिद्धीची जबाबदारी ‘महाराष्ट्र आरोग्य आयईसी ब्युरो’कडे आहे. त्याचे कार्यालय पुण्यातील येरवडा येथे आहे. कोरोनाला कसे ओळखायचे, त्यापासून प्रतिबंध कसा करायचा, याची माहिती मनोरंजक पध्दतीने देण्यासाठी विभागाने ‘टिकटॉक’चा आधार घेतला आहे. या अ‍ॅपवर आरोग्य विभागाने सिनेअभिनेते, गायक, नामांकित डॉक्टर यासह नामांकित व्यक्तींच्या संदेशाचे व्हिडीओ तयार करून ते अ‍ॅपवर अपलोड केले आहेत. अगदी आरोग्यमंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह प्रसिद्ध डॉक्टरांचे संदेश, कार्टून यांचे व्हिडीओ बघितले जात आहेत. त्यांना दादही मिळत आहे.टिकटॉकवरील अकाउंट लोकप्रियटिकटॉकवर आरोग्य विभागाने ‘महा आरोग्य आयईसी’ या नावाने प्रोफाईल तयार केले आहे. त्याला एक लाख ४८ हजार जणांनी फॉलो केले असून जवळपास १४ लाख जणांंनी लाईक केले आहे. यावर अपलोड केलेल्या व्हिडीओला २४ हजार दर्शकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाची वस्तूनिष्ट आणि खरी माहिती नागरिकांना मिळण्यास मदत होत आहे.हे आहेत संदेशशारिरिक अंतर पाळा, वारंवार हात धुवा, कोणतीही वस्तू, गाडीची चावी घरात नेण्यापूर्वी सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्या, कोरोनाची साखळी कशी तोडायची, हे व आणखी कोरोनाप्रतिबंधात्मक बचाव करण्याचे संदेश व्हिडीओच्या माध्यमातून दिले जात आहेत. यापैकी काही व्हिडीओ कार्टूनच्या स्वरूपात असून त्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉक