शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिनियुक्तीच्या डॉक्टरांवर आरोग्य सेवेचा डोलारा

By admin | Updated: August 24, 2016 00:23 IST

जिल्हाभरात सध्या साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे.

१२ पदे रिक्त : १५ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमालामंगेश भांडेकर चंद्रपूरजिल्हाभरात सध्या साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे. मात्र डॉक्टरांच्या अनुपस्थीतीने वेळेवर उपचार मिळत नसल्याची बोंब रूग्णांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त असून १५ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा प्रतिनियुक्तीवरील डॉक्टरांच्या खांद्यावर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा उपलब्ध नसल्याची बोंब सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आवश्यक सर्व औषधसाठा पुरविल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या सांगण्यानुसार औषधांचा प्रश्न मिटला असला तरी, आरोग्य केंद्रांत डॉक्टरच उपस्थित राहत नसल्याने उपचार मिळणे कठीण जात आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे, त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या ठिकाणी प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. एकाच डॉक्टरला दोन ठिकाणी कार्यरत राहून सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे नियुक्तीच्या मुळ ठिकाणी आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. प्रतिनियुक्तीसाठी २० वर्षापुर्वीच्या पत्राचा आधार घेतला जात असल्याने ही प्रतिनियुक्ती काहींना सोयीची तर काहींना गैरसोयीची ठरत आहे. काही जण वरिष्ठांकडे सेटींग लावून प्रतिनियुक्ती करून घेत असल्याचाही प्रकार घडत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. मात्र कित्येक वर्षांपासून ही पदे भरल्या न गेल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.अनाधिकृत गैरहजर डॉक्टरांवर कारवाई व्हावीपोंभुर्णा व कोरपना तालुक्यातील नारंडा व विरूर गाडेगाव येथील आरोग्य केंद्राचे डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृत गैरहजर आहेत. तर इतरही ठिकाणचे डॉक्टर अनाधिकृत गैरहजर असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे विस्कळीत झालेली आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही एखाद्या आरोग्य केंद्रात नियुक्ती दिल्यास आरोग्य सेवा सुधारू शकतो. प्रतिनियुक्तीवर असलेले डॉक्टरफिरते आरोग्य पथक वणी (खु.) येथील डॉ. मेश्राम यांना चंदनखेडा आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. भारी फिरते आरोग्य पथकाचे डॉ. मानकर यांना मोहाळी नलेश्वर, मोखाळा फिरते पथकाचे डॉ. खोरडे यांना वरोरा तालुक्यातील सावरी, नवेगाव मोरे आरोग्य केंद्राचे डॉ. चिखलीकर यांना माढेळी, वासेराचे डॉ. चांदेकर यांना जिवती, आष्टा अ‍ॅलेपॅथिक दवाखान्याचे डॉ. मुंजनकर यांना मुधोली, टेमुर्डा येथील डॉ. भट्टाचार्य यांना कोसरसार, तोहोेगाव येथील डॉ. आसुटकर यांना पोंभुर्णा, धाबा येथील डॉ. लोणे यांना पोंभुर्णा, आर्युवेदीक दवाखाना पारडी येथील डॉ. कुरेशी यांना आरोग्य केंद्र मांडवा व कोळशी आर्युवेदीक दवाखाना, सावरगाव येथील अ‍ॅलोपॅथीक दवाखान्याच्या डॉ. सारिका राऊत यांना नवेगाव पांडव, बेंबाळ येथील आरोग्य केंद्राचे डॉ. निलंगेकर यांना नवेगाव मोरे व नवेगाव पांडव येथील डॉ. गेडाम यांना भिसी येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. पदव्युत्तर डॉक्टरांच्यापगाराचा भारसध्यास्थितीत जिल्ह्यातील १५ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेले आहेत. हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून या कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार नियुक्त आरोग्य केंद्रातून जिल्हा परिषद आरोग्य विभाग काढत असते. या डॉक्टरांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ एखाद्या आरोग्य केंद्रातील रूग्णांना होणे आवश्यक आहे. मात्र सदर डॉक्टर जिल्हा सामान्य रूग्णालयात नियुक्ती मिळवून घेत असल्याने त्यांच्या पगाराचा भार जि.प. आरोग्य विभागाला सहन करावा लागत आहे. आरोग्य सेवेचा समतोल राखण्यासाठी प्रतिनियुक्ती करणे आवश्यक असून त्यानुसारच डॉक्टरांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.