शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला शेततळे योजनेला थंड प्रतिसाद

By admin | Updated: May 17, 2016 00:39 IST

मोठा गाजावाजा करुन राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली असली तरी...

केवळ १४४ अर्ज : एकाही शेततळ्याला सुरूवात नाहीनागभीड : मोठा गाजावाजा करुन राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली असली तरी नागभीड तालुक्यात या योजनेला अतिशय थंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अगोदर शेततळे तयार करावे हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे बोलल्या जात आहे.दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. अगदी एका पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पीक जात आहे. अशावेळी हे शेततळे शेतकऱ्यांच्या मदतीला यावेत. तसेच पावसाचे पाणी जागीच मुरावे या हेतुने ही योजना सुरू करण्यात आली असली तरी आर्थिकदृष्टया हतबल असलेले या तालुक्यातील शेतकरी या योजनेस प्रतिसाद देण्याच्या मन:स्थितीत नाहीत असेच एकंदर चित्र आहे.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार योजना सुरू होऊन बरेच दिवस झाले असले आणि या योजनेचा बराच गाजावाजा झाला असला तरी नागभीड तालुक्यात आतापर्यंत केवळ १४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या १४४ अर्जापैकी ११९ अर्जांनी मंजुरी देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करुन शेततळ्याचे काम सुरू करावे, अशा सुचनासुद्धा येथील कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिल्या आहेत. असे असले तरी आजतागायत एकाही शेतकऱ्यांने शेततळ्याच्या कामास सुरूवात केली नसल्याचे माहितीगाराकडून समजले.या १५ बाय १५ बाय ३ शेतळ्यावर २२ हजार ११०, २० बाय १५ बाय ३ शेततळ्यावर २९ हजार ७०६, २० बाय २० बाय ३ शेततळ्यावर ४० हजार ४७६, २५ बाय २० बाय ३ शेततळ्यावर अगोदर हा पैसा स्वत: खर्च करावयाचा आहे. काम झाल्यानंतर या कामाची तपासणी संबंधित विभाग करेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल, असे या योजनेत प्रावधान आहे. सध्यास्थितीत या तालुक्यातील शेतकरी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. तोंडावर आलेला हंगाम कसा करायचा ही चिंता त्यांचेसमोर आ वासून उभी आहे. दरवर्षी निसर्ग दगा देत असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडून त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अश्या स्थितीत शेततळ्यावर तो कुठून आणि कसे खर्च करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)