शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे ‘त्यांनी’ घेतली होती शपथ!

By admin | Updated: January 20, 2015 23:09 IST

शुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती.

कुणी केली स्वाक्षरी, कुणी मारले अंगठे! गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरशुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती. ‘आम्ही कुठल्याही आमिषाला, कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही... दारूबंदीच्या घोषणेशिवाय माघार घेणार नाही...’ शांत वातावरणाला चिरत जाणाऱ्या त्या प्रतिज्ञेतील शक्तीची प्रचिती मंगळवारी तब्बल साडेचार वर्षांनी आली आणि घरोघरी लावलेल्या प्रतिज्ञांच्या तसबिरींनी आज जणू ऐतिहासिक शिलालेखाचा आयाम आला !चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीचा ध्यास घेतलेल्या श्रमिक एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आता आभाळापेक्षाही विशाल आणि शब्दातही न व्यक्त करता येण्यासारख्या झाल्या आहेत. गेल्या दशकापासून सुरू असलेल्या अथक संघर्षाला आलेले यश या आंदोलनकर्त्याच्या डोळातून वाहणाऱ्या आनंदाश्रूतून प्रगट होत असल्याचे चित्र आज मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसत होते.दारूबंदी आंदोलनाचा ध्यास घेऊन श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, डॉ. राणी बंग आदींच्या पुढाकारात आणि हजारो महिलांच्या सहभागातून उदयास आलेल्या आंदोलनाची सार्थकता मंत्रीमंळाच्या निर्णयाने झाली आहे. ग्रामस्वच्छता आणि व्यसनमुक्तीचा सदोदित ध्यास घेतलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आभियानाची स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या पुढाकारात निर्धार यात्रा काढण्यात आली होती. यात ७० महिला आणि ३० पुरूष असे १०० जण सहभागी झाले होते. १० आक्टोबर २०१० रोजी या कार्यकर्त्यांनी गुरूकुंज मोझरी येथे जाऊन शपथ घेतली होती. आश्रमाचे तत्कालिन सर्वाधिकारी बबनदादा वानखेडे यांनी प्रकाशदादा वाघ यांच्या उपस्थितीत या सर्वांना शपथ दिली होती. एक हात उंचावून या सर्वांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी शपथ घेतली होती. त्यानंतर प्रत्येकाने समाधीच्या ओट्यावर शपथेचा छापिल कागद ठेवून राष्ट्रसंतांच्या साक्षीने त्यावर स्वाक्षरी केली होती. ज्यांना स्वाक्षरी येत नव्हती त्यांनी अंगठा मारला होता. दारूबंदीच्या निधाराने झपाटलेल्या या प्रार्थनेच्या बळामुळे आणि प्रतिज्ञेच्या शक्तीमुळे लढ्याला यश आल्याची भावना आंदोलकर्त्यांची आहे.