शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

त्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर जीव देण्याचा केला प्रयत्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 16:10 IST

पतीने पत्नीची घरातच गळा दाबून हत्या केली. नंतर शेतात जाऊन पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंधली गावात घडली.

ठळक मुद्दे पतीची प्रकृती गंभीरवरोरा तालुक्यातील बंधली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पतीने पत्नीची घरातच गळा दाबून हत्या केली. नंतर शेतात जाऊन पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंधली गावात घडली. सरला सुभाष धोटे (५०) असे मृतक महिलेचे नाव आहे.पती सुभाष धोटे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले. कौटुबिक वादातून हत्या झाल्याचे मानले जात आहे.सुभाष धोटे व त्याची पत्नी सरला यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. वादात सुभाषने सरलाची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती वंधली येथील पोलीस पाटलाने वरोरा पोलीस ठाण्याला दिली. वरोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले तेव्हा पती सुभाष धोटे याने शेतात जावून विष प्राशन केल्याची बाब पुढे आली. पोलिसांनी सुभाषला तातडीने उपचारार्थ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर त्याच्या घराचा पंचानामा केला असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. यावरून पती-पत्नीमध्ये झटापट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशातच सुभाषने पत्नीची गळा दाबून हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सुभाष धोटे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. सरलाचा गळा दाबण्यात आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धार्थ गेडाम यांनी दिली.

टॅग्स :Murderखून