शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवर डोळा ठेवून नगरसेवक झाले ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST

जिल्ह्यात एकमेव असलेल्या चंद्रपूर महापालिकेची पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टीचे येथे वर्चस्व असून ...

जिल्ह्यात एकमेव असलेल्या चंद्रपूर महापालिकेची पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टीचे येथे वर्चस्व असून महापौर, उपमहापौर भाजपाचे आहे. ६६ नगरसेवक असलेल्या या पालिकेत १७ प्रभाग आहे. मात्र सत्ताधारी पक्ष आपल्याच नगरसेवकांकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सातत्याने सुरुच ठेवला आहे. दरम्यान, कोरोनामुळे विकास कामावर संकट आले आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षी काम करून नागरिकांना खुश करण्याच्या मनस्थितीत असलेल्या नगरसेवकांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे कुठूनही काहीही मिळो, वार्डात काम दाखविण्यासाठी सद्यस्थितीत नगरसेवकांनी महापालिकेत चकरा मारणे सुरु केले आहे.

बाॅक्स

विकेट जाण्याची भीती

मागील चार वर्षांमध्ये प्रभागामध्ये काम न करता केवळ मनपामध्ये सभेला जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता या नगरसेवकांना विकेट जाण्याची भीती आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या वर्षात तरी नागरिकांसाठी काही करावे, या विचाराने आता त्यांच्याही चकरा वाढल्या आहे.

बाॅक्स

सामान्य नागरिकांमध्ये नाराजी

मागील चार वर्षांमध्ये शहरात काही विकास कामे झाली असली तरी अद्यापही नागरिकांच्या जिव्हाळ्याचे विषय सोडविण्यासाठी प्रयत्न झाले नाही. त्यामुळे संबंधित नगरसेवकांवर नागरिकांची नाराजी आहे. बोटावर मोजण्याइतक्याच नगरसेवकांच्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली आहे. मात्र इतरांच्या वार्डातील नागरिकांमध्ये सद्यातरी नाराजीचाच सूर आहे.

बाॅक्स

स्वेच्छा निधी केवळ ३ लाख

महापालिकेमध्ये नगरसेवकाला स्वेच्छा निधी खर्च करण्यासाठी मिळतो. मागील काही वर्षांपासून ३ लाख रुपये प्रत्येक वर्षासाठी दिले जात होते. दरम्यान, दोन वर्षापूर्वी महापालिकेने ठराव ठेवून हा निधी १२ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाचे संकट आले आणि निधीमध्ये काटकसर करण्यात आली. परिणामी नगरसेवकांना ३ लाखांमध्येच वार्डात काम करावे लागत आहे.

बाॅक्स

१७ प्रभागात ६६ नगरसेवक

शहरात १७ प्रभाग आहे. यामध्ये दोन प्रभाग सोडले तर प्रत्येकी ४-४ नगरसेवक निवडून आले आहे. दरम्यान, हिंदुस्थान लालपेठ आणि आंबेडकर नगर या दोन प्रभागामध्ये प्रत्येकी ३-३ नगरसेवक निवडून आले आहे.