शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिल शेतकरी झिजवतो बँकांचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:22 IST

विनेशचंद्र मांडवकर।आॅनलाईन लोकमतनंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, ...

ठळक मुद्देबळीराजाचा टाहो : कर्जमाफीचे पैसे आलेत का ?

विनेशचंद्र मांडवकर।आॅनलाईन लोकमतनंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, हे विचारत तलाठी कार्यालय व बँकांचे उंबरठे झिजवत आहे.चालू कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के कसाबसा लाभ मिळाला असल्याचे बँक अधिकारी सांगतात. थकबाकीदार व परिस्थितीने नडलेला शेतकरी मात्र आजही डोळ्यात प्राण आणून कर्जमुक्तीची वाट बघत आहे. पुढील हंगामात बियाणांकरिता पैशाची व्यवस्था कशी करावी, मुलीचे लग्न कसे करावे, पोरांची शाळा-कॉलेज शुल्क कसे भरावे, या विवंचनेत आहे.जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आजही दु:खाचे सावट पसरले आहे. बीजी-२, नंतर बीजी-३ आली. बोंडअळीस प्रतिकारक म्हणून बीजी-२ या कपाशीच्या बियाण्यांचा गाजावाजा झाला. तणसमारक म्हणून बीजी-३ या कपाशीला शेतकºयांनी डोक्यावर घेतले.बीजी-३ व बीजी-२ बोंडअळ्यांनी पोखरून टाकली. कंपन्या व अधिकारी मात्र गलेलठ्ठ झाले. एकीकडे शेतकऱ्यांचा उध्दारकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांनी गाजावाजा केला. आज शेतकरी त्याची नुकसान भरपाई मागत आहे. तरीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषिपंपांकरिता बँकांकडे अर्ज केल्यास या प्रक्रियेत थकीत पीक कर्ज आड येत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.लाख मोलाचे पीक गेले. रोगप्रतिकारक म्हणून बीजी-२ कपाशी लावली. ती बोंडअळ्यांनी फस्त केली. शासनाने बोगस बियाणे पास केले. कंपन्या व संबंधित अधिकारी याला जबाबदार आहेत. आम्हाला बोगस बियाण्यांची नुकसान भरपाई द्यावी व डोक्यावरील कर्ज मुक्त करावे. तसेच हमीभावाने तूर खरेदी करावी व खरेदी केंद्र सुरू करावे.- वसंत जिवतोडे, जेष्ठ कार्यकर्ता, शेतकरी संघटना.