शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिमेंट मिक्सरमध्ये हात अडकलेल्या कामगाराची दीड तास मृत्यूशी झुंज

By admin | Updated: December 6, 2015 00:48 IST

वरोरा नाकाजवळील आयटीआयच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामावर असलेल्या गोपाल काशिनाथ निकोडे या मजुराने मृत्यूचा थरार अनुभवला.

कटरने मशीन कापून सुटका : भररस्त्यावर सुरु होता जीवघेणा थरारचंद्रपूर : वरोरा नाकाजवळील आयटीआयच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामावर असलेल्या गोपाल काशिनाथ निकोडे या मजुराने मृत्यूचा थरार अनुभवला. सिमेंट मसाला मिसळणाऱ्या मिक्सर मशीनमध्ये त्याचा हात कोपरापर्यंत अडकला. तब्बल दीड तास तो अडकलेल्या अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होता. अखेर कटर मशीनने हे मिक्सर कापून त्याचा हात मोकळा करण्यात आला.वरोरा-चंद्रपूर मार्गावर शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काम करीत असताना गोपाल निकोडे (रा. सुशी दाबगाव, ता. मूल) २३ वर्षीय मजुराचा हात अचानकपणे फिरत्या चाकात गेला. तो पुढे ओढत जाऊन अगदी ढोपरापर्यंत तो ओढला गेला. हे लक्षात येताच मशीन बंद करण्यात आली. त्यामुळे सुदैवाने तो बचावला. हात सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात तो पुन्हा आत ओढला जात होता. तब्बल दीड तास तो वेदनेने विव्हळत अडकून होता. हा प्रकार लक्षात आल्यावर आयटीआयमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कटर मशीन आणून मिक्सर कापण्यात आले. त्यासाठी बराच वेळ खर्ची गेला. वाहतूक पोलीस आणि रामनगरचे पोलीसही पोहोचले. त्यांनीही मदत करून मिक्सरमधील मसाला रिकामा केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर मशीन कापण्यात यश आल्यावर त्याची सुटका झाली. वाहतूक पोलिसांनी आपल्या कर्तव्यतत्परतेचा परिचय दिला. वाहतूक पोलीस निरीक्षक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रामनगर पोलिसांच्या शिपायांनीही मदतकार्यात भाग घेतला. त्यानंतर काळी यांनी स्ववाहनाने जखमी मजुराला रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. (जिल्हा प्रतिनिधी)