शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लालतोंड्या माकडांचा हैदोस

By admin | Updated: August 9, 2015 01:14 IST

मागील सहा महिन्यांपासून कोठारीत लालतोंड्या माकडांनी सर्वत्र हैदोस घातला असून गावकरी त्रस्त झाले आहेत.

कोठारीवासी त्रस्त : माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणीकोठारी : मागील सहा महिन्यांपासून कोठारीत लालतोंड्या माकडांनी सर्वत्र हैदोस घातला असून गावकरी त्रस्त झाले आहेत. माकडांचा त्वरित बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेकडो गावकऱ्यांनी कोठारी वन कार्यालयात जावून वनक्षेत्रसहायक एन.आर. भोवरे यांना निवेदन दिले.सहा महिन्यांपूर्वी परप्रांतातील लालतोंड्या माकडांना ट्रकमध्ये भरुन रात्रीच्यावेळी कोठारीच्या जंगलात सोडण्यात आले. या माकडांची फौज कोठारी गावात दाखल झाली आहे. माकडे मोठ्या प्रमाणात असून त्यांनी गावात धुडधूस घालणे सुरू केले आहे. गावकऱ्यांच्या घरात घुसून घरातील अन्न, धान्य, कपडे आदी पळवू लागले. माकडांना हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपापयोजना करुन पाहिल्या. मात्र माकडे माणसांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. उलट माणसांवर ते हल्ला करीत आहेत. परिणामी त्रस्त गावकऱ्यांनी कोठारी येथे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देवून बंदोबस्ताची मागणी केली. वनाधिकाऱ्यांनी गावात ठिकठिकाणी फटाके फोडून माकडांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र माकडे त्यांनाही जुमनात नाहीत. उलट रात्रंदिवस माकडांचा प्रकोप वाढू लागला. गावकऱ्यांचे नुकसान होवू लागले. अखेर कंटाळलेल्या गावकऱ्यांनी ७ आॅगस्टला वनकार्यालय जाऊन माकडांचा त्वरित बंदोबस्त करा किंवा गावकऱ्यांना बंदोबस्त करण्याची मुभा द्या, अशी मागणी केली. यात जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु, पं.स. सदस्या सुमन लोहे, ग्रा.पं. सदस्य सुनील फरकडे, मोरेश्वर लोहे, विनोद बुटले, मामा जुनघरे यांचा समावेश होता. अखेर वनक्षेत्रसहाय्यक भोवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निवेदन पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे येत्या दहा दिवसांत माकडांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकरी परतले. गावात शिरून माकडे गावकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. नागरिकांना, महिलांना, बालकांमध्ये या माकडांची दहशत पसरली आहे. या माकडांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)