शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील तलाव, नाले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:26 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे सावट : जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिवती तालुक्यात ३३ गावे असून ७० हजार येथील लोकसंख्या आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपुर्ण कोरडवाहु क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पाऊस झाला नाही आणि जवळपास पाण्याची साठवणूक होईल, असे तलाव किंवा बंधारे तालुक्यात नाहीत.काही गावात तर शासनाच्या महत्त्वाच्या योजनाच पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील शेतकºयांना शाश्वत शेती करता येत नाही आणि जास्त उत्पन्नही घेता येत नाही. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भुगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील तलाव-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना नवे वर्ष तहानलेले जाणार की काय, असे चिन्ह दिसून येत आहेत.जिल्हा प्रशासनाने लवकरच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा जिवती तालुक्याच्या पहाडावर पाणी टंचाई नक्कीच उग्ररूप धारण करेल, यात शंका नाही.पाण्यासाठी भटकंतीयेल्लापूर, लांबोरी, टेकामांडवा येथील गाव तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो. परंतु यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे ही तलावे समाधानकारक भरली नाही. उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबत जंगली प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तलाव-नाल्याचे खोलीकरण आवश्यकतालुक्यात निसर्गाचे पाणी साठवणूक करण्यासाठी मोठे तलाव निर्माण करण्याची गरज आहे. तलाव बांधासोबतच तलाव-नाल्याचे खोलीकरण केल्यास नक्कीच पहाडावरील जमिनीत पाण्याची पातळी वाढविण्यास मदत मिळेल. यासाठी शेतकºयांना सुद्धा तेवढेच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.