शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवंतांनी समाजाच्या हितासाठी झटावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:22 IST

माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चंद्रपुरात क्षत्रिय माळी समाजाचा मेळावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्राीबाई यांचा आदर्श डोळद्घासमोर ठेवून या समाजाने विविधांगी क्षेत्रास गवसणी घातली आहे. समाजाची आणखी प्रगती करण्यासाठी समाजातील ज्ञानवंतानी समाजाच्या उत्कर्षासासाठी झटावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.स्थानिक महात्मा ज्योतीबा फुले सांस्कृतिक सभागृहात क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ व अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सर्वशाखीय माळी समाज उपवर-उपवधू परिचय मेळावा रविवारी पार पडला. या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश ठाकरे, क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार, जि.प.चे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण तिखे, मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव वानखेडे, प्रभाकरराव बनकर, डॉ.संजय घाटे, नगरसेवक प्रशांत दानव, विजय चहारे, पांडूरंग गावतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेविका शितल गुरनुले, लोनबले, संजिवनी चहारे, राजू बनकर, निलेश खरबडे, डॉ. मनोहर लेनगुरे, धनंजय दानव, विलास वानखेडे, माजी नगरसेवक रवि गुरनुले, भाजपा जिल्हा महामंत्री राहूल सराफ, राजेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते.ना. अहीर पुढे म्हणाले शेती विकास, युवकांना प्रशिक्षण व कौशल्य विकास आदी विषयावर केंद्र व राज्य सरकार प्राधान्य क्रमाने कार्यरत आहे. व त्याचे चांगले परिणाम आपण अनुभवतो आहोत. शेवटच्या घटकांचा विकास हे सरकारचे धोरण असल्याने या घटकांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. मातीशी नाड जोडलेल्या व मातीशी नाते जपणाºया माळी समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घेत उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आ. शामकुळे यांनी उपवर-उपवधू मेळाव्याचे आयोजन हे बदलत्या काळाला व परिवर्तनशील विचाराला अंगिकृत करणारे लक्षण आहे. असे प्रतिपादन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे, माळी समाज महासंघाचे पदाधिकारी व माळी समाजातील उपवर- उपवधू व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.