शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अहीरकर-वारजुकरांच्या राजकारणावर गुरनुलेंचे बाण

By admin | Updated: August 27, 2015 01:12 IST

विनोद अहीरकर आणि सतीश वारजुकर हे केवळ विरोधक म्हणून जिल्हा परिषदेत वागत आहेत.

चंद्रपूर : विनोद अहीरकर आणि सतीश वारजुकर हे केवळ विरोधक म्हणून जिल्हा परिषदेत वागत आहेत. मात्र आपल्या कार्यप्र्रणालीमुळे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामध्ये बाधा येत आहे. यामुळे त्यांनी आपल्यावर आरोपसत्र चालविले आहे, असा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला.मागील अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील योजना आणि विकासकामांच्या अंमलबजावणीत जिल्हा परिषद अध्यक्षांकडून होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आणि अडवणुकीसंदर्भात आरोप होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर आणि माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांच्याकडून मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या आरोपांना आज संध्या गुरनुले यांनी प्रथमच उत्तर दिले. यावेळी शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य चौखे आदी उपस्थित होते. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना संध्या गुरनुले म्हणाल्या, मारोडा येथील बंधाऱ्याच्या बांधकामात आपले नाव जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्यक्षात या कामाचे वर्क आॅर्डर ग्रापमंचायतीला दिले असून एजंसीही ग्रामपंचायतच आहे. आपल्या नातेवाईकांना यात काम दिल्याचा आरोप निराधार आहे. आपण अध्यक्ष असल्याने कामाच्या नस्ती पाहणे आणि बाळगणे हा अधिकार आहे. योग्य कालावधीनंतर आपण नस्त्या परतही केल्या आहेत. मात्र त्या संदर्भातही आरोप आपल्यावर आरोप झालेत. जलयुक्त शिवार योजनतील कामाला जिल्ह्यात गती असल्याचा दावा त्यांनी केला.१३ व्या वित्त आयोग निधीच्या खर्चासाठी ३१ सप्टेंबर २०१५ ही मुदत ग्रामीण विकास मंत्रालयाने दिली आहे. यातून मिळालेला एक कोटी ४२ लाख रूपयांचा निधी अखर्चित राहील्याचा आरोपही खोटा असल्याचे त्या म्हणाल्या. या निधीतील कामाचे ३१ मार्चपूर्वीच नियोजन झाले असून यातून ग्रापंचायतींना सौर दिवे, फॉगींग मशिन, ५४ ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी साडेतीन लाख रूपयांचा निधी, असे नियोजन करण्यात आले असून ३१ सप्टेंबरपर्यंत निधी खर्च होणार आहे. स्थायी समितीची विशेष सभा घेण्यात चालढकल केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. अशी सभा घेण्याची कुठेच तरतुद नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे ५४ कोटी रूपये परत जाणार असल्याचा आरोप जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील ४२ कोटी २८ लाख रूपये अखर्चित राहील्याचे मान्य करून त्या म्हणाल्या, या निधीचे नियोजन केले असून कामाच्या कार्यारंभाचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना मुदतवाढ देण्याची बाब आपल्या अधिकारात येत नाही. तरीही ३५ योजनांना मुदतवाढ दिल्याचा आरोप आपल्यावर लावला जात आहे. ही बाब प्रशासकीय स्तरावरील असून प्रशासनाने मान्यता दिली आहे. तत्कालिन अध्यक्षांच्या काळातही या कामासाठी मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी आता आम्हीही आरोप करायचे काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)नियमानुसार काम तर करा- विनोद अहीरकरजिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी नियमाप्रमाणे काम करावे. त्या नियमानुसार काम करणार असतील, तर आम्ही अडथळे आणण्याचा प्रश्नच येणार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य विनोद अहीरकर यांनी संध्या गुरनुले यांना प्रत्यत्तर दिले. ‘लोकमत’ने या आरोपांसंदर्भात त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमचे स्वार्थ कोणते आणि कोणत्या फाईलमध्ये आहेत, ते एकदा त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी केलेले सर्व खुलासे मोघम असून वस्तुस्थितीपासून दूर नेणारे आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगावे, आम्ही पुराव्यानिशी चर्चेला तयार आहोेत. लवकरच त्यांच्या गैरकारभाराचा पर्दाफाश आम्ही करणार असून त्यांना नेमका कुठे इंन्टे्रस्ट आहे, ते सांगू. १३ व्या वित्त आयोगाच्या कामात स्पष्टता होती तर त्यांनी दोन पत्र का काढले, हे आधी स्पष्ट करावे. ग्रामपंचायतींना ५७ पॉवर पॅक देण्याचे ठरले असतानाही तब्बल तीन महिने यादी का पाठविली गेली नाही, हे सुद्धा त्यांनी सांगावे, असाही प्रश्न उपस्थित केला.