शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:54 IST

पूर्वविदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ६८ वी खरीप २०१८ समितीची सभा सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : पूर्वविदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : पूर्वविदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ६८ वी खरीप २०१८ समितीची सभा सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. सिसोदिया, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, उद्यान विद्या प्रमुख डॉ. बी. एन. गणवीर, कृषी अर्थशास्त्र, डॉ. व्ही. एस. टेकाडे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र प्रमुख डॉ. ए. एस. इंगोले उपस्थित होते. सभेची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते मालार्पण व दीप प्रज्वलन करुन झाली. सर्वप्रथम विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी. व्ही. शेंडे यांनी प्रास्ताविकात पूर्वविदर्भ विभागीय धान पिकावर मागील वर्षीपर्यंत झालेल्या संशोधनाची विषयनिहाय माहिती दिली.संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार कृषी संशोधन केंद्र- कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र मिळून करावा, असे सूचविले. कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यापीठनिर्मित तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे विस्तार व प्रसार होण्यासाठी कृषी विभाग व संलग्न विभाग आणि विद्यापीठ यांनी एकत्रीतपणे काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. तसेच पूर्व विदर्भात धान पिकाचे पेरीव पद्धतीचे अवलंबन करुन रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारी घेण्याचे आवाहन केले. जेणेकरुन पशुधनासाठी ज्वारीसोबत चाऱ्याचे उद्दिष्ट साध्य करु शकतील. दुबार पीक घेतल्याने शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होईल, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. अरविंद तुपे यांनी मान्सून २०१८ पूर्वानुमान व वाटचालीविषयी मार्गदर्शन केले.या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि आत्मा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया यांनी आपापल्या विभागाचे कार्याचे अहवाल व खरीप नियोजनाचे सादरीकरण केले. सभेचे संचालन प्रा. डॉ. सोनाली लोखंडे तर आभार प्रा. पी. के. राठोड यांनी मानले. या खरीप समितीच्या सभेला कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती