शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सार्डतर्फे मानव वन्यजीव संषर्घावर मार्गदर्शन

By admin | Updated: August 2, 2015 01:15 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे ...

चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष समस्या डोके वर काढू पाहात आहे. या समस्येची तीव्रता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त सोशल अ‍ॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट (सार्ड) चंद्रपूर या ग्रामीण विकास व वन्यजीव क्षेत्रात सदैव कार्य करणाऱ्या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील पारोधी येथील २० युवकांना प्रत्यक्ष जंगलात नेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या भाणूसखिंडी येथे एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे आणि प्रा. योगेश दुधपचारे उपस्थित होते. प्रा. डॉ. दुधपचारे हे आपल्या भाषणात म्हणाले, २००२ पासून २०१५ पर्यंत १३५ मानवांचा मृत्यू मानव वन्यजीव संघर्षात झाला आहे. त्यापैकी ६२ लोक हे वाघ आणि बिबट यांच्या हल्ल्यात तर १७ लोक रानडुकरांच्या हल्ल्यात मारल्या गेले आहे. ९५ टक्के मृत्यू जंगलात झालेले आहे. त्यामध्ये फक्त ६ लोकांचा मृत्यू कोअर भागात तर जास्तीत जास्त मृत्यू बफर व इतर भागात झालेले आहेत. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. मोहफुले आणि सरपणाच्या काड्या आणण्यासाठी महिल्या जंगलात जात असल्यामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी ही समस्या वाढण्यामागे मानवसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आपण नियमांचे पालन करीत नाही. जंगलातील आपला वाढणारा हस्तक्षेप कारणीभूत ठरत असल्याचे पटवून दिले. जंगलात अंधार पडल्यावर जाऊ नये. जंगलात खूप अंतर आत जाऊ नये, एकट्याने जाऊ नये, टेंभुर, मोह, जांभुळ, सरपनाच्या काड्या याचा अतिमोह करु नये, असे महत्वाचे मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)