शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:40 IST

जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी जोमात सुरु असून वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने तस्करांचे फावत आहे. गडचांदूर येथील काही जण तालुक्यातून गारगोटी गोळा करुन ते अवैध मार्गाने जयपूर, औरंगाबाद या ठिकाणी पाठवित आहे.

फारूख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी जोमात सुरु असून वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने तस्करांचे फावत आहे. गडचांदूर येथील काही जण तालुक्यातून गारगोटी गोळा करुन ते अवैध मार्गाने जयपूर, औरंगाबाद या ठिकाणी पाठवित आहे.तालुक्यातील चिखली बिट, देवाडा बिट, शेणगाव बिट व पाटण बिटातून, तुमडीगुडा, रेगागुडा, चिखली, नाईक नगर, पुन्नागुडा, गणेरी, पाटन, हिरापूर, गोदापूर, नंदप्पा, सगणापूर, आंबेझरी, पल्लेझरी, शेनगाव, ताडीहिरापूर परिसरातील शेतातील व जंगलातील गारगोटी बाल मजूर लावून १७ किलो रुपये या प्रमाणे घेवून ते पाटण, शेनगाव, भेंडवी, गडचांदूर या मार्गाने अवैध वाहतूक करुन ते जयपूर, औरंगाबाद येथे पोहचविल्या जात आहे.याकडे मात्र वन कर्मचारी व अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. सोनापूर, भेंडवी येथे वनविभागाचे चेक पोस्ट आहे. मात्र हजारो टन गारगोटीची वाहतूक होत असतानाही कधीच कारवाई केली जात नसल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे जिल्हाधिकारी आहेत. आता त्यांनीच या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर आळा घालण्याची माणगी आहे.बालकामगारांचा समावेशअवैध गारगोट्यांची शेतातून व जंगलातून उचल करण्यासाठी बाल कामगारांचा वापर सुरु आहे. शेकडो शाळकरी विद्यार्थी शाळा सोडून या कामात दिवस रात्र गुंतले आहेत. ही बालमजूर कायद्याची पायमल्ली आहे.तेलंगणातील बेला येथे झाली कारवाईजिवती तालुक्यातून नेलेल्या गारगोटी जंगलात जमा करुन नंतर ट्रकद्वारे शेणगाव, पाटण, भेंडवी, सोनापूर, गडचांदूर, कोरपना मार्गे औरंगाबाद येथे नेण्यात येते. या ट्रकवर तेलंगणा राज्यातील बेला येथे नुकतीच कारवाई झाली आहे. मात्र तालुक्यातून अद्याप अशी कारवाई झालेली नाही.