शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

गुढीपाडवा- गडी माणसांचा दिवस

By admin | Updated: March 28, 2017 00:28 IST

पूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो.

गुढीतून मिळतो संदेश : ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्त्ववसंत खेडेकर बल्लारपूरपूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो. तरीही, विविध प्रांत आणि देशांचे आपापले दिवस, महिना आणि वर्ष आहेत. त्याला व्यवहाराची पूर्णत: जोड नसली तरी त्यावर बरीचशी कामें काढली व केली जातात. मराठी हिंदू संस्कृतीमध्ये नववर्ष गुढी पाडव्याचे आपले एक विशेष महत्व आहे. ग्रामीण भागात तर नव वर्षाचा प्रारंभ दिन गुढी पाडव्याला विशेष महत्व आहे. तदवतच चैत्र ते फाल्गुन या बाराही महिन्याला महत्व देण्यात आले आहे. चंद्रपुरात भरणारी महाकाली यात्रा चैत्र महिन्यातच भरते. राणी हिराईने चैत्र महिन्याचे महत्व ओळखले. तेव्हापासून चैत्र महिन्यात यात्रा भरविण्यात येत असते. शेतीचे कामंही मराठी महिन्याच्या तारखेने, त्यावरील ऋतू दिनमानाने उरकली जातात. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी, शेतीच्या कामावर गडी माणस बारा महिन्याकरिता घेतात. ते गुढी पाडण्यालाच! गुढी पाडवा येण्यापूर्वीचा गडी माणसाचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो गडी माणूस आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. गडी माणूस आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन गडी माणूस ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच! गुढी पाडव्याला घुगऱ्याला महत्व आहे. गुढी पाडव्याआधीच शेतातील बरीचशी पीक घेऊन धान्य घरी आलेले असतात. ते सारे धान्य त्यात ज्वारी, गहू, हरभरा, तूर, वाल, पोपट आदीचे मिसळ करुन त्यांच्या घुगऱ्या शिजविल्या जातात. शेतामध्ये आंब्याची झाडं असतातच व आंबे लागून असतात. त्याची चटणी आणि घुगऱ्या, असे नववर्षाच्या स्वागताचे ग्रामीण पदार्थ! घुगऱ्या आपआपल्या इष्टदेवतांपुढे नैवेद्य ठेवून मगच सारे जण खातात. आणि गडी माणसाला खायला देतात. साखरगाठी, गडवा, आंबा व कडूनिंबाची पानं, रंगीन कपडा या वस्तूंनी गुढी उभारली जाते. घरोघरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरण लावली जातात.गडी माणसाला सोबत घेऊन शेतीवर पूजा केली जाते. पूर्वी गडी माणसाला महिन्याला सात कुडव (एका कुडवात आठ पायली) ज्वारी, सोबत मिरची, तुळ कौरे दिल्या जाई. त्यामुळे गडी माणसाला ‘सात कुडव्या’ असे म्हटले जात असे. आता ती पद्धत बदलली आहे. नगरी ठरलेले पैसेच दिले जातात. पूर्वी कामाचे तास नसायचे असाता काम तासाने गडी माणूस करतो. पूर्वी गडी माणूस घरचा एक सदस्य मानला जाई. पाहुण्यांची ने आण कर, त्याचा मान कर व घरची इतर कामं तो करायचा. आता ती स्थिती राहिली नाही. व्यवहारीक्ता आली असे कास्तकार सांगतात पण, तरीही काही ठिकाणी अपवाद म्हणून तसे ही गडी माणसं आहेतच! आज गडी माणूस म्हणून नवीन मालकांकडे रुजू होत असलेल्या गडी माणसांना शुभेच्छा!गुढी काय देते संदेशगुढी उंच उभारली जाते. त्याचा अर्थ, आपले ध्येय उंच आणि मोठे असावे. साखरेची गाठी (माळ; व सोबत कडूनिंबाची उगाळी याचा अर्थ दु:खानंतर सुख येतोच हा सकारात्मक दृष्टीकोण, फूलांचा हार म्हणजे जीवन सुगंधीर करा. वस्त्र ठेवण्याचा अर्थ, आयुष्यात आपण नाती, धाग्यांप्रमाणे घट्ट जोडायला हवे, गडवा उलटा ठेवतो यातून संदेश अपाल्या ओंजळीतल दुसऱ्यांना द्या, दातृत्वाची भावना मनात ठेवा!मराठी हिंदू महिना आणि तारखी अर्थात तिथी याचे लग्न कार्यात मोठे महत्व आहे. विवाहाचा मुहूर्त काढताना त्याचा प्रामुख्याने विचार करुन तिथी त्याप्रमाणे ठरविली जाते. मराठी वा हिंदी भाषिक हिंदुच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका बघा! त्यात चैत्र कृ. शके १९३९ (सध्या इंग्रजी वर्ष २०१७) असा उल्लेख दिसेल. मराठी आणि इंग्रजीच्या वर्षामध्ये एवढे अंतर कां? (मराठी १९३९ तर इंग्रजी २०१७) याचे उत्तर ज्योतिषीच देऊ शकतात.