शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाह वनपरिक्षेत्र घडविणार भारत मातेचे रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांचे सैनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : गावखेड्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत बल्लारशाह वनपरिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील ५० ग्रामीण युवकांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार सैन्य व पोलीस भरतीची निवासी प्रशिक्षण, तसेच स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येत आहे. त्यामुळे या ५० तरुणांचा सैन्यभरतीचा मार्ग सुकर झाला आहे. वनसंवर्धन व वनसंरक्षण हेच वनविभागाचे काम नसून, वनालगत असलेल्या गावाची काळजी घेऊन गावातील लोकांना मार्गदर्शन करणे. त्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून देणे. नवनवीन योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे हा आहे. याच पार्श्वभूमीवर कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांचे सैनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत त्यांच्या प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेमार्फत करण्यात येत आहे. 

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात वनसमिती कार्यरत आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे, बेरोजगार तरुणांची माहिती मिळताच, तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत आम्ही पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांना सैन्य व पोलीस भरतीचे प्रशिक्षण देत आहोत. - संतोष थिपे,वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग