शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:13 IST

तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतमधील अनियमिततेविरोधात तक्रार करण्यात आली होती.

कढोली ग्रामपंचायत : चौकशी अहवाल दडपलाभद्रावती : तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतमधील अनियमिततेविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्याची चौकशी होऊन पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी भद्रावतीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.भद्रावतीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे कोंढा येथील अशोक लिपटे यांनी कढोलीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. कढोलीचे ग्रामविकास अधिकारी डुकरे आपल्या कार्यालयात अनियमित असतात ते कार्यालयात न आल्याबाबत लिपटे यांनी विचारणा केली तर अपशब्दात अरेरावीची भाषा वापरली. ग्रामपंचायत कार्यालयात आपली कामे घेऊन ४-४ किलोमटर अंतरावरील लोक येत असतात. पण डुकरे उपस्थित नसल्याने त्यांना हात हलवित परत जावे लागते.डुकरे यांनी नवीन हायवे ते कढोली पांदण रस्त्याची निविदा न काढता स्वत: काम करून घेतले. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कढोली येथे २०१० ते २०१५ या पाच वर्षात किती निधी प्राप्त झाला, किलोनी, कुरूडा, बोलथाळा येथे किती झाडे लावली, वृक्षारोपणावर किती खर्च झाला आदीची सविस्तर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.कोंढा ग्रामपंचायतमधील वॉर्ड क्र. ३ येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची निविदा कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आली, त्यासाठी किती निधी प्राप्त झाला व किती शिल्लक आहे, अशी मागणीही करण्यात आली. त्याचा पाठपुरावा लिपटे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केला. त्यावरून कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांनी आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)