शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:06 IST

जिल्ह्यासाठी अनुकूल असे वातावरण वरोरा शहरात असल्याने वरोरा जिल्हा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वरोरा जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

ठळक मुद्देविविध संघटनांची मागणी : वरोराच मध्यवर्ती ठिकाण

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : जिल्ह्यासाठी अनुकूल असे वातावरण वरोरा शहरात असल्याने वरोरा जिल्हा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वरोरा जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. वरोरा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असताना संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करुन आपल्या मागणीचे निवेदन दिले.वरोरा शहर जिल्ह्याच्या दृष्ट्रीने मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच शहरात प्रशासकीय कार्यालयासाठी सुसज्ज इमारत, शासकीय जमीन, चारही दिशेला जोडणारी मुख्य रेल्वे लाईन, चौपदरी रस्ता, तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा वरोरा शहरात उपलब्ध आहेत. परिणामी वरोरा शहराला जिल्हा घोषित करताना अत्यल्प खर्च येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाचे विभाजन करून वरोरा जिल्ह्याची निर्मिती करावी. अशी मागणी करण्यात आली. यासोबतच गांधी सागर तलावाचे खोलीकरण करण्याकरिता निधी द्यावा, वरोरा तालुक्यात वनपर्यटनाची परंतु चिमुर वनक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेली वनजमीन वगळता वरोरा तालुक्यात एकूण ८३३४.४९ हेक्टर वनजमिन उपलब्ध आहे. या व्यतीरीक्त महसुल विभागाची जमीन उपलब्ध आहे. यापैकी सुर्ला, सालोरी, मेसा, टेमुर्डा, रामपूर या परिसरात एकूण ३१७९.०२ हेटर जमिन वरोरा परिसरातील वरोरा ते शेगाव, वरोरा ते टेमुर्डा, रामपूर या भागात आहे. याठिकाणी वनपर्यंटनाचे केंद्र उभारल्या शासनाला मोठ्या प्रमाणात राजस्व निर्माण होईल. त्यामुळे वनपर्यंटन केंद्र उभारण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. यावेळी वनमंत्री मुनगंटीवार तलाव खोलीकरणासाठी एक करोड रुपये देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रविण धनवलकर, माजी मंत्री संजय देवतळे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबा भागडे, मुख्यधिकारी सुनिल बल्लाळ, तसेच जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.