शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी घेतला राजुरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST

उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरला दिली भेट राजुरा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, कोविड केअर सेंटर ...

उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरला दिली भेट

राजुरा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, कोविड केअर सेंटर समाजकल्याण वसतिगृह राजुरा येथे शुक्रवारी भेट दिली. येथील कोरोना रुग्णांना विचारपूस करून व्यवस्था जाणून घेतली. यानंतर लगेच उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात विधानसभा क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

सर्वसामान्य जनता सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहे. राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्‍शन तसेच अन्य आवश्यक समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे सतत प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरात लवकर येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार हरिष गाडे, तहसीलदार महिंद्र वाकलेकर, तहसीलदार के. डी. मेश्राम, मुख्याधिकारी आर्शीया जुही, डॉ विशाखा शेळकी, सूर्यकांत पिदुरकर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, बापूराव पाचपटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश नगराळे, डॉ. डी. पी. चकोले, डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. संदीप बांबोळे, डॉ. गेडाम, डॉ. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, डॉ. अशोक जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, उपविभागीय अभियंता बाजारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेवक हरजीत सिंग, नायब तहसीलदार विनोद डोंनगावकर, अमित बनसोडे, अतुल गांगुर्डे आदी आढावा बैठकीत उपस्थित होते.