शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

गैरप्रकार करणाऱ्यास बढती देऊन गौरव

By admin | Updated: June 25, 2016 00:49 IST

मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्ल्हारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी व तोहोगाव वनक्षेत्राचे तत्कालीन वनपाल ...

वरिष्ठही सहभागी : एफडीसीएम अधिकाऱ्यांचा प्रतापकोठारी : मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्ल्हारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी व तोहोगाव वनक्षेत्राचे तत्कालीन वनपाल अजय पवार यांनी सन २०१४-१५ या वर्षातील निष्कासनाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला. त्यांनी दहा ते पंधरा लाखाच्या शासकीय निधीची विल्हेवाट लावून महामंडळाला चुना लावला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल न घेता उलट त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढती देत गौरव केला आहे.तोहोगाव वनपरिक्षेत्रात अजय पवार वनरक्षक म्हणून रुजू झाले. वनरक्षक ते वनपाल पदापर्यंत त्यांचा कार्यकाळ अनेक प्रकरणाने चर्चेत राहिला. आपल्या पदाचा व आपल्याकडील जंगल कामाचा त्यांनी चांगलाच फायदा घेतला. वेळोवेळी महामंडळाला आर्थिक चुना लावून स्वत:चे हित साधण्याचा सपाटा सुरू केला. त्यांच्या प्रत्येक गैरप्रकाराची वेळोवेळी तक्रारी झाल्या. मात्र वरिष्ठ अधिकारी स्वत:चे खिसे गरम करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षणाची कवच कुंडले प्रदान करीत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पदापर्यंत बढती दिली. त्यास इतर विभागात बदली करण्यापेक्षा मध्य चांदा प्रकल्पांतर्गत ठेवून गैरप्रकार करण्यास रान मोकळे सोडले आहे. सन २०१४-१५ या वर्षात तोहोगाव वनपरिक्षेत्रात वनपाल असताना त्यांनी कक्ष क्र. २९ टीपीआरडब्ल्यू कामात तसेच कक्ष क्र. २३ मध्ये बांबू फुलोरा बांबू कटाई कामात काम न करता निधीची उचल करुन अफरातफर केली. ७०० ते ८०० आडजात बीट तसेच दोन ते तीन हजार बांबू बंडल न तोडता पैशाची उचल केली. सदर बाब ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात बाजार भावाप्रमााणे १३ लक्ष रुपयाचा गैरप्रकार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र ठोस कारवाई करण्यास दचकले. याबाबत विभागीय स्तरावर उलटसुलट चर्चा असून गैरप्रकार करण्यास बळ देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सक्त कारवाईची अपेक्षा नाही. (वार्ताहर)वनमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजवनविकास महामंडळात अनेक गैरप्रकार होत असून त्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नाही. गैरप्रकारात अग्रेसर असलेल्या महामंडळाच्या कारभारावर सध्या कुणाचे नियंत्रण नाही. महामंडळाच्या कामात नियमितता आणण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केल्यास अपप्रकार करणाऱ्यांवर ठोस कारवाई होऊ शकते.