शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासाठी रोपांनी फुलल्या रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:46 IST

राज्यात सर्वत्र १ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने आधीच रोपांची निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देसामाजिक वनिकरण विभाग सज्ज : वढोलीत तीन लाखांवर रोपे

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : राज्यात सर्वत्र १ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने आधीच रोपांची निर्मिती केली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील रोपवाटिकेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक एस.एस. करे, वनपरिक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार, वनरक्षक मत्ते, रोपवाटिका देखरेख करणारे राजेश माडूरवार यांच्या परिश्रमातून वढोली रोवाटिकेत सुमारे ३ लाख १० हजार रोपांची रोपवाटिका फुलली आहे. यासाठी सामाजिक वनिकरण विभाग वढोली परिक्षेत्राचे वनरक्षक मत्ते यांनी रोपवाटिकेत ३ लाख १० हजार रोपांचे सवर्धन केले आहे. यामध्ये २५ वेगवेगळ्या जातीचे रोपे आहेत. साग,बांबू,शिसू, कुसुम, गुलमोहर, कडुलिंब, निलगिरी, शिवन, करंज यासह १३ विविध प्रकारची फळझाडेदेखील आहेत. संपूर्ण रोपवाटिका हिरव्यागार रोपांनी नटली आहे. १ जुलैपासून राज्यात होणाऱ्या ऐतिहासिक वृक्ष लागवड उपक्रमात ही रोपे तालुक्यातील ग्रामपंचायतींना वितरित केल्या जाणार आहे. उर्वरित रोपांची वनकन्या समृधी योजना, रानमाळा व विविध योजनेअंतर्गत विविध भागात लागवड केली जाणार असल्याची माहिती वनरक्षक मत्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जुलै महिन्याच्या प्रारंभापासून सुरू होणाऱ्या वृक्षरोपणाच्या या महामोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. काळाची पावले ओळखून ही मोहीम राबवली जात आहे.- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.