शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

गटशेतीने उत्पादन वाढीचा प्रयत्न

By admin | Updated: May 15, 2014 01:01 IST

शेतीसाठी उपयुक्त यंत्र सामुग्री प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे शक्य होत नाही किंवा शासनाला यावर अनुदान देणेसुध्दा परवडत नसल्याने ..

गडचिरोली : शेतीसाठी उपयुक्त यंत्र सामुग्री प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे शक्य होत नाही किंवा शासनाला यावर अनुदान देणेसुध्दा परवडत नसल्याने जिल्ह्यात २0 ते ३0 नागरिकांचे गट तयार करून या गटांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री पुरविली जात आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. एकूण उत्पादनाच्या सुमारे ८0 टक्के वाटा धान उत्पादनाचा आहे. मात्र येथील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री खरेदी करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर धान लागवडीची आधुनिक पध्दत शेतकर्‍यांना माहित नाही. धान पिकाची रोवणी, निंदन, कापणी व मळणीसाठी मोठय़ा प्रमाणात मजुरांची गरज भासते. धान पिकाच्या रोवणीच्या कामाला एकाच वेळी सुरूवात होत असल्याने या कालावधीत मजूर मिळणे कठीण होते. बर्‍याचदा धानाची लागवड उशिरा होत असल्याने धान उत्पादनात कमालीची घट होत असल्याचा शेतकर्‍यांचा अनुभव आहे.या सर्व अडचणींचा विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २0 ते ३0 नागरिकांचा एक गट तयार केला आहे. या गटाला पावर टिलर, भात रोवणी यंत्र, कापणी यंत्र, निंदनासाठी कोनो रिडर, युरीया ब्रिकेट तयार करणारी मशीन आदी यंत्रे अनुदानावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वगळता ११ ही तालुके मानव विकास मिशनमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत. या तालुक्यातील नागरिकांना मानव विकास मिशनच्या निधीतून यंत्र सामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांचे एकूण ३७ गट तयार करण्यात आले आहेत. याच बरोबरच आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने शेतकर्‍यांचे २२ वेगळे गटसुध्दा बनविण्यात आले आहेत.यंत्र कसे चालवावे, त्याची काळजी कशी घ्यावी, मॅट नर्सरीचे प्रशिक्षण, आधुनिक पध्दतीने शेती आदी विषयी जवळपास ७0 शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)