अस्वच्छता कारणीभूत : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रूग्णाच्या भेटीतळोधी (बा.) : तळोधी (बा.) येथील वार्ड नं. ५ मधील अनेक नागरिकांना हगवण, उलटी व तापाने ग्रासले आहे. त्यामुळे अनेक रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी (बा.) व ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रूग्णालयात उपचार घेत आहेत.तळोधी (बा.) येथील वार्ड नं. ५ मधील वार्ड सदस्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील नाल्यांची योग्य पद्धतीने साफसफाई तसेच गावाशेजारील शेणखतांचे गड्डे बुजविल्या गेले नाही. त्यामुळे परिसरात मच्छरांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना आजाराची लागण झाली आहे. ग्रामपंचायतकडे फॉगिं मशीन उपलब्ध असतानाही ग्रामपंचायत योग्य नियोजनाअभावी तिचा वापर केला जात नाही. या परिसरातील अनेक लोकांच्या घरी शौचालय नाही. त्यामुळे नागरिक उघड्यावर शौचास जातात. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून फॉगिंग मशीनचा वापर होणे आवश्यक आहे. येथील पिंटू हरिदास चंदनखेडे (२५) या युवकाला डायरियाची लागवड झाल्यामुळे सदर युवक प्राथमिक स्वा. केंद्र तळोधी (बा.) येथे उपचार घेत आहे. प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित पटले यांनी वार्ड नं. पाच मधील हगवण, उलटी व ताप असलेल्या रुग्णांच्या घरी भेट दिली. त्यांच्यासोबत आरोग्यसेवक एस.एस. काळमेघ, के. डब्ल्यू. पेंदाम, व्ही. जे. पटील, के.पी. वटी व आशावर्कर रंजना बोकडे व निता शेंडे यांची उपस्थिती होती.गेल्या काही दिवसांपासून अनेक गावात साथीच्या आजाराची साथ पसरली असून आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. मात्र (वार्ताहर)
तळोधी (बा.) येथे ग्रॅस्ट्रोची लागण
By admin | Updated: August 30, 2016 00:36 IST