शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

जाणता राजांना घराघरांत अभिवादन (महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना...या बातमीतील मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी काय आवाहन केले ते पाहून दुरुस्त करणे... वाक्याचा अर्थबोध होत नव्हता...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST

भवानजीभाई चव्हाण विद्यालय, चंद्रपूर फोटो चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचलित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ ...

भवानजीभाई चव्हाण विद्यालय, चंद्रपूर

फोटो

चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचलित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सी. डी. तन्नीरवार, उपमुख्याध्यापक सी. बी. टोंगे यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. अनिल डहाके यांनी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन व आभारप्रदर्शन प्रशांत झाडे यांनी केले.

फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, वीर, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी मार्गदर्शन करताना मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड म्हणाल्या, शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा आदर, सुरक्षा व्हायची. यावेळी मनसे महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके, उपाध्यक्ष वाणी सादलावार, वीणा बोरकर, वर्षा भोमले, दर्शना वल्लरवार, शीतल उत्तरवार, स्मिता डोनेवार आदी उपस्थित होते.

फोटो

शिव ब्रिगेड, चंद्रपूर

चंद्रपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतीश मालेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिव जन्मोत्सवानिमित्त शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रा. अनिल डहाके यांनी शिव जन्मोत्सव गावागावांत, चौकाचौकांत आणि घराघरांत साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी इंजि. विक्रांत टोंगे, इंजि. राजेश पोलेवार, मयूर पाऊणकर, महेश बावणे, प्रलय म्हशाखेत्री, खुशाल काळे, इंजि. सचिन बुटले, विलास माथनकर, प्रेमचंद धांडे, संतोष देरकर, नितेश उपरे, अभिषेक मोहुर्ले, आशिष गावतुरे, आचल शेंडे, पूनम रामटेके, सपना गेडाम, राणी मावलीकर, पायल वेलादी, दीप्ती वाकुलकर, प्रतीक्षा बोंडे, राणी कावळे आदी उपस्थित होते.

फोटो

महानगरपालिका चंद्रपूर

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेतर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर कंचर्लावार म्हणाल्या, जनतेचा राजा, महाराष्ट्राचे आराध्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. जयंती उत्सव साजरा करताना हे विसरू नका की, कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. त्याला खंबीरतेने सामोरे जायचे आहे. बेसावध राहू नका, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करा, असे आवाहन केले. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, कवडू नेहारे, प्रदीप पाटील, गुरुदास नवले, विकास दानव व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

विठाई बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर

चंद्रपूर : जगन्नाथ बाबा नगर येथे विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी संजीवनी कुबेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे ओमप्रकाश मिसार, वैभव माकोडे, संदीप कष्टी, दीपक शेळके, भारती कश्यप, कीर्ती नगराळे, प्रीतम रागीट, शिल्पा शेळके, साक्षी डवरे, सिद्धेश डवरे आदी उपस्थित होते.

मातोश्री विद्यालय, चंद्रपूर

चंद्रपूर : स्थानिक गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित मातोश्री विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक संजय बिजवे, प्राथमिक मुख्याध्यापिका संध्या वाढई, पर्यवेक्षक प्रवीण रोकमवार, सुनील बुटले, पवन पिदुरकर, मनोहर कायडिगे, कवडू कायर्डिग, कैलास रहाटे, पुरुषोत्तम बसुने, सतीश पाटील, गिरीश इटनगर, जितेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.