शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने चंद्रपुरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हजारो आंबेडकर अनुयायांनी व इतर समाजातील नागरिकांनी आपल्या लाडक्या महामानवाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देउत्साहाचे वातावरण : जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने चंद्रपुरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हजारो आंबेडकर अनुयायांनी व इतर समाजातील नागरिकांनी आपल्या लाडक्या महामानवाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी शहरात उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासून शहरातील वॉर्डावॉर्डातून पांढरे वस्त्र परिधान करून आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याकडे निघाले. सकाळी ८ वाजतापासूनच अनुयायी बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत होते.सकाळी १० वाजता मुख्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते. यावेळी सामूहिक बुध्दवंदनाही घेण्यात आली.त्यानंतर रात्री वॉर्डावॉर्डातही बुध्द वंदना घेऊन सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.विविध पक्षांकडून अभिवादनमहामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटी, भाजपा, शिवसेना, भारिप, बहुजन समाज पार्टी यासह विविध राजकीय पक्षांकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ठिकठिकाणी सरबत, महाप्रसादाचे वितरणडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने सरबत वितरण व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा अनेक नागरिकांनी आस्वाद घेतला.ग्रामीण भागातही कार्यक्रमचंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात, शाळा-महाविद्यालयात, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय जिल्ह्यात कोरपना, गडचांदूर, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पालकमंत्र्यांनी केले अभिवादनराज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांनी शनिवारी सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.