चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे सेनानी स्मृतिशेष गिरीशबाबू खोब्रागडे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना घोटेकर म्हणाले, गिरीशबाबू यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्यानंतर त्यांनी नेतृत्व स्वीकारून आंबेडकर चळवळ गतिमान केली, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी समितीच्या प्रमुख डॉ. विजया गेडाम, प्रा. रोशन गजभिये, प्रा. गिरीश पंचभाई, डॉ. बीना मून उपस्थित होते. संचालन प्रा. दुष्यंत नगराळे यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.