पळसगाव (पिपर्डा) : अखंड भारतात स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पळसगाव (ता. चिमूर) येथील अखिल भारतीय बौद्ध समाज व माळी महासंघातर्फे महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नालंदा बौद्धविहार येथे तरुणांनी महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कोविड - १९चे नियम पाळून पाहुण्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अ. भा. अध्यक्ष दामोदर रामटेके, सचिव प्रभाकर गजभिये, नरेश पाटील, सुरेश शेंडे, गीता शेंडे, शंकर वाटगुरे, तुकाराम गुरनुले, ज्ञानेश्वर गुरनुले, सरिता गुरनुले, वैभव रामटेके, संदीप ढोक, नागसेन पाटील, किशोर भीमटे, भिसम राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.